नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक जिल्हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक , दि. १३ :- नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी,ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामु...