पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा. मुंबई,दि.२ :- पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.शासकीय विभाग,विविध संस्थाबरो...

अशोका मार्ग श्री.श्री.रविशंकर मार्ग शिवजन्मोत्सव सोहळा समिती बैठक पदाधिकाऱ्यांची निवड

इमेज
नाशिक :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ईश्वर प्रतिष्ठा–२, श्री. श्री.रविशंकर मार्ग,अपोलो फार्मसी शेजारी, नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक भव्य,शिस्तबद्ध व यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन करण्यात आली.याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.अध्यक्ष अजिंक्य बाळा वाढणे,उपाध्यक्ष प्रवेन घोलु गवारे,कार्याध्यक्ष साहिल पाटील, खजिनदार महेश पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषीकेश चव्हाण,यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.नियोजन, जबाबदाऱ्या वाटप व समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.मोठ्य...

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

इमेज
नाशिक,दि.२ फेब्रुवारी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले.आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर,आमदार सरोज आहिरे,माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,आनंद सोनवणे,सीमंतिनी कोक...

येवल्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने 'दादा' व्यक्तिमत्व गमावले; येवला येथील शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या शोकभावना व्यक्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोबत आणला अस्थिकलश स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने एक जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड - मंत्री छगन भुजबळ स्व.अजितदादा यांचे महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेले विचार पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.२फेब्रुवारी:-स्व.अजितदादा पवार यांचे निधनाने माझ्या आयुष्यात ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे. आजही त्याचं निधन मन स्वीकारला तयार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि जिंदादिल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,अशा शब्दात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली.यावेळी ते बोलत ह...

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र - राज्यपाल आचार्य देवव्रत

इमेज
'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन मुंबई, दि. 27 :- समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले.‘हाय ऑन कसोल’ या पुस्तकाचे लेखक,पत्रकार व अध्यापक आदित्य कांत,हे या पुस्तकाचे लेखक आहेत.पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल,असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना...

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन

इमेज
शोकसभेस मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी राहणार उपस्थित नाशिक,दि.३१ जानेवारी :- नाशिक शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास मंदिर सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.स्व.अजितदादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.या सर्वपक्षीय शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकार मधील प्रमुख मंत्री,विविध पक्षांचे खासदार,आमदार,पदाधिकारी,कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात“मोटिलिटी क्लिनिक”चा शुभारंभ

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागात पचनसंस्थेशी संबंधित हालचाली (Gut Motility) आणि कार्यातील बिघाडामुळे होणाऱ्या त्रासांवर अचूक निदान व प्रभावी उपचार देण्यासाठी “मोटिलिटी क्लिनिक” (Motility Clinic) सुरू करण्यात आले आहे.हे क्लिनिक डॉ.सोहम दोशी,डॉ.संदीप पाटील आणि डॉ. अमोल शिंदे यांच्या तज्ज्ञ टीमच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना ॲसिडिटी, सतत पोट फुगणे, पोटात जडपणा,अन्न गिळताना त्रास,छातीत जळजळ,वारंवार ढेकर येणे,मळमळ,उलट्या,बद्धकोष्ठता,जुलाब, मलावरोध,तसेच“इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS)”सारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक वेळा नियमित तपासण्यांमध्ये काहीही गंभीर आढळत नाही, मात्र पचनसंस्थेची हालचाल आणि कार्यातील असंतुलन हे यामागचे मुख्य कारण असू शकते.अशा रुग्णांसाठी मोटिलिटी क्लिनिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना सविस्तर सल्लामसलत,लक्षणांचे शास्त्रीय मूल्यांकन,योग्य तपासण्यांचे नियोजन तसेच वैयक्तिकृत उपचार योजना देण्यात येणार आहे.यामध्ये आहार ...

कुंभमेळ्याशी निगडित विकास कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीतजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आढावा बैठकीत निर्देश

इमेज
नाशिक,दि.26 :- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याशी निगडित विविध विकास कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक शहरातील द्वारका सर्कल अंडरपास,नदी घाटांचे बांधकाम, विमानतळ विस्तारीकरण यासह विविध विकास कामांचा मंत्री महाजन यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री महाजन म्हणाले की,पुढील वर्षी कुंभमेळा होत असून यावर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल.आगामी कुंभमेळा स्वच्छ,सुंदर, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित करावयाचा आहे.देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक यांना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन AWR अँड हर्निया सर्जरी’ (COEAWR) मान्यता

इमेज
ओबेसिटी क्लिनिकचेही भव्य उद्घाटन नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांना Abdominal Wall Reconstruction Surgeons’ Community (AWRSC) तर्फे ‘Center of Excellence in AWR & Hernia Surgery (COEAWR)’ ही मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलला Abdominal Wall Reconstruction (AWR) Surgery आणि Hernia Surgery या क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून अधिकृत ओळख मिळाली आहे.ही मान्यता १ जानेवारी २०२६ पासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.ही मान्यता प्रामुख्याने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ. संदीप सी. सबनीस,यांच्या नेतृत्वाखाली AWR व हर्निया शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण,उच्च दर्जाच्या आणि रुग्ण-केंद्रित कामगिरीबद्दल देण्यात आली आहे.त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये डॉ.प्रखर गुप्ता,डॉ.उर्विक पाटील, आणि डॉ. हेमंत बागुल,यांचा मोलाचा सहभाग असून, हॉस्पिटलचे भूलतज्ञ,ऑपरेशन थिएटर (OT) टीम आ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांचे भव्य-दिव्य, हृदयस्पर्शी स्वागत झ्युरिक, दि.१८ :- ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वधर्म,स्वदेश आणि स्वभाषा वसा घेऊन,भारताला विकासाच्या उत्तुंग वाटेवर घेऊन जाऊया,असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वित्झर्लंड झ्युरीक येथील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या स्वागताचा स्वीकार केला.येत्या काळात महाराष्ट्र भारतातील ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीचे राज्य म्हणून उदयास येईल. त्यामुळे विदेशात राहणाऱ्या मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अभिमान आणखी वृद्धिंगतच होईल,असा विश्वास व्यक्त करत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मराठी बांधवांचा विदेशातील महाराष्ट्राचे राजदूत असा गौरवाने उल्लेख केला.मुख्यमंत्री फडणवीस यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी येताच त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश,पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. ...

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
राज्याच्या सर्व भागासाठीवैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज उद्योग,गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र झ्युरिक, दि. 19 :- ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो.त्यामुळेच जगभरातील उद्योजक,गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे.त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे.त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे.सरतेशेवटी देशासाठी ही बाब चांगलीच ठरते.पण यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत प्रतिनिधीमंडळासमवेत दावोस येथे दाखल झाले आहेत.या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलीयन मध्ये माध्यमांशी संवाद साधला.महाराष्ट्रा...

शहरातील रोटरी क्लब हाॅल येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

इमेज
नाशिक दि.18:- नाशिक शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांचा राष्ट्रीय प्रेस महासंघ स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब हॉल गंजमाळ येथे सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त,जयंत महाजन संपादक दैनिक महासागर,नगरसेविका हिंमगौरी आडके, सपकाळे सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,प्राचार्य श्रीकांत सोनवणे,शरद तायडे,शरद आलई,नाशिक स्टार न्यूज चे संचालक विलास सूर्यवंशी,पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप दीक्षित,प्रदेशउपाध्यक्ष अनिल वैद्य,उपाध्यक्ष किशोर दीक्षित,नाशिक शहराध्यक्ष राजेश गोसावी,डॉ रेश्मा घोडेराव,क्राइम रिपोर्टर तबरेज शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकार दिनानिमित्त सोहळ्यात शंभर पत्रकारांचा सन्मानचिन्ह प्रमाणपञ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीकांत सोनवणे,हे होते कार्यक्रमांचे शेवटी आभार विलास सुर्यवंशी,यांनी मानले.सोहळा यशस्वी करण्यासाठी स्टार न्यूजचे राजेश गोसावी,दीपक भावसार,संजय राजगुरू,हेमंत कुलकर्णी,सदाशिव जगताप,विलास बोरसे,सोनू आडके,विजय ठाकूर,नानासाहेब देवरे,संदीप...

नाशिकमध्ये सकल मराठा परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा आणि जलदान उपक्रम संपन्न

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- राजमाता जिजाऊ जन्मोत्सव, स्वामी विवेकानंद जयंती आणि संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रेचे औचित्य साधून नाशिकमधील 'सकल मराठा परिवाराच्या' (SMP) वतीने त्र्यंबकेश्वरकडे पायी निघालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यात आली.सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.'वारकरी सेवा हीच खरी शिवभक्ती' हा विचार केंद्रस्थानी ठेवून सोमवारी (दि. १२ जानेवारी) सकाळी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी नाशिकमार्गे पायी प्रवास करतात. या प्रवासात वारकऱ्यांना आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत,यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची जागेवरच तपासणी करून आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वाढत्या उन्हाचा विचार करता जलदानाची सेवाही देण्यात आली.या उपक्रमाबाबत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की,"राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी सम...

प्रभाग २३ मध्ये भाजपा उमेदवारांची भव्य रॅली प्रभाग पिंजून काढत विजयाकडे वाटचाल

इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रुपालीताई निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,चंद्रकांत खोडे,या उमेदवारांच्या प्रचारार्थ डीजीपी नगर–१ व इंदिरा नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली .या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत औक्षण केले.प्रचार फेरी भारत नगर,नंदिनी नगर,शिवाजी वाडी,घरकुल योजना,दिपाली नगर,शर्मा मंगल कार्यालय,सुचिता नगर लेन,शिवसृष्टी कॉलनी, श्रीराम नगर,विनय नगर,अमृतवर्षा कॉलनी, साईनाथ नगर,इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक,गीतांजली कॉलनी,प्रसन्न कॉलनी,योगेश्वर कॉलनी, एलआयसी कॉलनी,शास्त्रीनगर,आदर्श कॉलनी, झेडपी कॉलनी,गुरुकृपा कॉलनी,सिद्धिविनायक कॉलनी परिसर, श्रीराम सोसायटी,बाबू बंगला परिसर,एसबीआय कॉर्निंग,चार वाजताच्या घरी चौक या मार्गाने मार्गक्रमण करत संपन्न झाली.यारॅलीत बापूसाहेब कुलकर्णी,अरुण दोंदे,वैशाली पिंगळे,सुनील बच्छाव,दिगंबर गवळी,सुरेश भावसार,योगेश घुगे,रवींद्र पाटील,विजय राळेगावकर, भगवान शिंदे,अरुण महाशब्दे,वैभव कुलकर्णी,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले...

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २३ मधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करावे - मंत्री गिरीश महाजन

इमेज
नाशिक :-  महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज प्रभाग क्रमांक २३ मध्ये आयोजित सभेला मंत्री गिरीश महाजन यांनी संबोधित केले.यावेळी त्यांनी उमेदवार रुपाली निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,चंद्रकांत खोडे,यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनीही प्रभाग क्रमांक २३.च्यासर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.या सभेसाठी राज्याचे जलसंपदा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन,आ देवयानी फरांदे,यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,नेते रवि अनासपुरे,माजी महापौर सतीश कुलकर्णी,अविनाश आंधळे, सुनील खोडे,श्याम पाटिल,प्रकाश ननावरे,अमृता सांगळे,अर्जुन काळे,आदींसह प्रभागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री गिरीश महाजन,यांनी यावेळी सांगितले की केंद्रात राज्यात,भारतीय जनता पक्षाचे सरकार असून नाशिक महानगर पालिकेतही भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर विकास कामे मोठ्या प्रमाणावर होतील.यावेळी प्रभाग क्रमांक २३ मधील उमेदवार रुपालीताई यशवंत निकुळे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्ण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना युतीची सभा

इमेज
राष्ट्रवादी शिवसेना युती शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईल - प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नाशिक,दि.१० जानेवारी :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक शहर व जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता यापुढील काळात विकासाच्या दृष्टीने एकत्र आलेली शिवसेना राष्ट्रवादीची युती या नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनल तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री गुलाबराव पाटील,माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार किशोर दर...

प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या उमेदवारांनी आयोजित केलेल्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद ठिक ठिकाणी स्वागत

इमेज
इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपचे चारही उमेदवारांनी संपुर्ण प्रभाग पिंजून काढला असुन, गोविंद नगर म्हसोबा महाराज मंदीरापासून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रभागातील महिला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावली सर्वज्ञ नगर सप्तशृंगी माता मंदिर परिसर‌ रॉयल कॉलनी प्रभू एम्पायर गोकुळ नगरी,श्याम ऑरनेट, रविशंकर मार्ग,अरण्यश्वर महादेव मंदिर परिसर,आशिष हेरिटेज,जागृती प्रतिष्ठान,आदींसह भागातून निघालेल्या प्रचार फेरीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.याप्रसंगी मंगेश काळे, अविनाश बुरकुले,सुनील माधव खोडे,प्रीतम गोस्वामी, हर्षद सोनवणे,भीमा शेठ मंगळूरे,सुनील कुलकर्णी, कहाणे साहेब,काकडे साहेब अनिल पवार,सोमनाथ आव्हाड,शांताराम नव्हाळे, बडगुजर साहेब, सरोदे साहेब शिंपी साहेब कविता शिरोळे नंदा बुचकुले,पुनम शिंदे, पेटकर ताई,कहाणे ताई,कर्हाडताई आदींसह मोठ्या प्रमाणावर प्रभागातील महिला नागरिकांनी प्रभाग क्रमांक २३ चे भाजपाच्या उमेदवार मा.नगरसेविका सौ रुपाली यशवंत निकुळे अ गट,मंगला नन्नावरे ब गट,संध्या कुलकर्णी क गट,ड गटातून जेष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे...

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मंत्री गिरीश महाजन यांची पोस्ट करत माहिती..!

इमेज
मुंबई :- राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. काही दिवसापूर्वीच नोव्हेंबर २०२५ महिन्याचा हप्ता १५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते.यांनतर डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा होणार असल्याचे बातमी समोर येत आहे.!लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.पुढच्या ४ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली आहे.लाडकी बहीण योजनेत याआधीच नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार होता.परंतु तेव्हा फक्त १५०० रुपये जमा झाले.त्यानंतर महिलांच्या मनात निराशा होती.त्यानंतर आता मात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपये येणार आहेत.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे.!त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे.त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.त्यामध्ये देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार.. मकर संक्...

संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
कांदिवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमत अनुयायी आश्रम आयोजित भंडारा व महाप्रसाद कार्यक्रम मुंबई, दि.४ :- सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली. संतमत परंपरेत मानवसेवा,समता,प्रेम व सद्भावना ही केवळ तत्त्वे नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे.या मूल्यांच्या प्रसारासाठी श्री सद्गुरु शरणानंदजी महाराज परमहंस यांच्या अनुयायांच्या माध्यमातून संतमत अनुयायी आश्रमाद्वारे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू आहे.मुख्यमंत्री म्हणाले की,संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे.मानवसेवा,समता,प्रेम व सद्भावना या...

प्रगत हृदयशस्त्रक्रियेत अशोका मेडिकव्हरचे नवे यश,डॉ.प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली 4 बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी

इमेज
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्यात आले असून,डॉ.प्रणव माळी (CVTS सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली चार बेंटॉल (Bentall) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत.या प्रसंगी बोलतांना डॉ.प्रणव माळी,म्हणाले की बेंटॉल प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची व जीव वाचवणारी हृदयशस्त्रक्रिया असून ती एओर्टिक रूट व एओर्टा (महाधमनी) च्या वरच्या भागातील आजारांवर केली जाते.या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेला एओर्टिक व्हॉल्व्ह, एओर्टिक रूट व चढती महाधमनी (Ascending Aorta) कॉम्पोझिट ग्राफ्टद्वारे बदलली जाते तसेच कोरोनरी आर्टरीज पुन्हा जोडल्या जातात.ही प्रक्रिया उच्च दर्जाचे शस्त्रकौशल्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी वैद्यकीय पथकाची गरज असते.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सर्व चार बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून,रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून ते सामान्य जीवन जगत आहेत.हे यश हॉस्पिटलच्या उच्च दर्जाच्या सुविधा व गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरील प्रभावी उपचार क्षमतेचे प्रतीक आहे.CVTS सर...

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी - विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

इमेज
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक, दि. ७ :- पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.कुंभमेळा प्राधिकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर,राकेश सेपट,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा,अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील,उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी),अर्पिता ठुबे(नाशिक),डॉ. शशिकांत मंगरुळे(निफाड)उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ,रवींद्र भारदे,महेश जमदाडे (भूसंपादन),सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे,राहुल पाटील, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ.गेडाम म्हणाले की,सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी...

प्रभाग क्रमांक ३० चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश सोनवणे यांना प्रभागातील संस्था,मित्रमंडळ नागरिकांचा पाठींबा, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

इमेज
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सतीश सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपूर्ण नाशिक शहराचा विकास हेच आपले प्रमुख ध्येय - माजी खासदार समीर भुजबळ नाशिक,दि.४ जानेवारी :- राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीत घटक पक्ष म्हणून काम करत आहे.त्यामुळे या नाशिक शहराचा विकास करणे हेच आपले प्रमुख ध्येय असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध विकासाची कामे मार्गी लावली जातील.लवकरच नाशिक शहराच्या विकासाचा रोड मॅप नाशिककरांच्या समोर घेऊन येत असून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.खा. समीर भुजबळ यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक ३० चे उमेदवार सतीश बापू सोनवणे,यांच्या राजीव नगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आनंद सोनवणे,मंगलाताई मोरे,अनिता सोनवणे,संतोष कुलकर्णी,शैलेश कुलकर्णी,अविनाश टिळे,वेडूजी सोनवणे,रावसाहेब गायधनी,मंगेश जाधव,संतोष भुजबळ,प्रभाग क्रमां...

दोन पिस्तूल आठ जिवंत काडतुसासह दोघे ताब्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

इमेज
दोघा गुन्हेगारासह पोलीस पथकाचा विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- मालेगाव शहरात अवैधरीत्या घातक पिस्तूल बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद नाशिक ग्रामीण पोलीस दल स्थानिक गुन्हे शाखा किल्ला पोलीस ठाणे मालेगाव यांची संयुक्त कारवाई दोन देशी बनावटीच्या बंदूक आठ जिवंत काडतुस हस्तगत.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ‌जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी तत्पर कारवाई करण्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,यांना दिनांक ०४/०१/२०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली की मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाणे हद्दीत दोन संशयित इसम अवैधरीत्या अग्नी शस्त्र घातक पिस्तूल दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने,किल्ला पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शहरातील इस्लामाबाद भागातून १)हिदायत शरीफ शेख वय २७ रा.भारत सिनेमा हाॅलजवळ न्यु नाना पेठ पुणे जिल्हा पुणे २)अब्दुल मलीक अकील अहमद वय १९ रा.ईस्लामाबाद मालेगाव ता मालेगाव जि.नाशिक,या द...

नाशिक मध्ये MNGL कडून 'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' चा शुभारंभ

इमेज
आर्यवर्त सोसायटीमध्ये पीएनजी पुरवठा सुरू नाशिक,१जाने :- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), जे गेल (GAIL), बीपीसीएल (BPCL) आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे, त्यांनी आज 'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' (National PNG Drive 2.0) चा शुभारंभ केला.याचसोबत आर्यवर्त सोसायटीमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठ्याचा प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते.यावेळी एमएनजीएलचे कार्यालयीन प्रमुख संदीप श्रीवास्तव,सोसायटीचे चेअरमन दत्तात्रेय कडव, सचिव जोशी सर यांच्यासह MNGL चे अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.'नॅशनल पीएनजी ड्राईव्ह २.०' हा पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाद्वारे (PNGRB) देशभरात पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी राबवला जाणारा उपक्रम आहे. गॅस-आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करणे या भारत सरकारच्या संकल्पनेशी हा उपक्रम सुसंगत आहे.या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी MNGL च्या अधिकाऱ्यांनी पीएनजीच्या फायद्यांवर प्रकाश टाकला,ज्यामध्ये अखंड...

ना.रोड रेल्वे स्टेशन येथील स्टॅाल मधून चोरी करणारे दोघे पोलीसांच्या ताब्यात

इमेज
नाशिक रोड :- फिर्यादी नामे इंद्र प्रताप सिंह वय 22 वर्ष धंदा स्टाँल वेडर रेल्वे स्टेशन नाशिक रोड हे दिनांक 1-1-2026 रोजी रेल्वे स्टेशन नाशिक रोड स्टाँल वर रात्रपाळी ड्युटी कामी हजर असताना दोन संशयित इसमा पैकी एका इसमाने त्यांना बोलण्यात गुग ठेवून त्यांच्या दुकानातील तोंडाला लावण्याचे मास्क परफ्युम बॉटल इयर बर्ड एकुण 5400 रोख रुपये असा 9475 रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात दोन इस्मानी चोरून नेला म्हणून आज 1-1-2026 रोजी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे येऊन सामान चोरी झाल्या बाबत लेखी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गु.र.नंबर 1/26 कलम 305(1),3 (5 ) सी बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील,यांच्याकडे देण्यात आला प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील, यांना गुप्त बातमी द्वारा कडून माहिती मिळाली एक काळ जॅकेट घातलेले दोन इसम हे रेल्वे स्टेशन मेन गेट येथे उभे आहेत त्यांना संतोष उफाडे पाटील,पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील,...

आपण करत असलेले काम ही देशसेवा 'एचएएल'च्या तंत्रज्ञांचे राज्यपालांकडून कौतुक

इमेज
नाशिक, दि. २ :- राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथील हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) येथे भेट देऊन तेथील विमान निर्मिती आणि अनुषंगिक बाबींची अतिशय आस्थेवाईकपणे माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील तंत्रज्ञ, अधिकारी यांच्याशीही संवाद साधत आपण खऱ्या अर्थाने देशसेवेचे काम करत आहात,अशा शब्दात कौतुकोद्गार काढले.राज्यपाल देवव्रत यांनी आज दुपारी एचएएल येथे येऊन देशाच्या संरक्षण साहित्य आणि उत्पादन निर्मितीच्या अनुषंगाने सुरू असलेले कामांची माहिती जाणून घेतली.देशाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण अशा सुखोई ३० एमकेआय, तेजस ध्रुव, प्रचंड यांच्या निर्मितीचा प्रवास तेथील अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्याकडून जाणून घेतला. विविध कक्षाना यावेळी त्यांनी भेट दिली.सुरुवातीला आगमन झाल्यानंतर एचएएलचे सीईओ साकेत चतुर्वेदी यांनी स्वागत केले, यावेळी कार्यकारी संचालक डायरेक्टर (एअर क्राफ्ट manufacturing डिव्हिसन) कार्यकारी संचालक (फायनान्स) शिशिरकुमार पात्रा,जनरल मॅनेजर (एअर क्राफ्ट overall division ) वरिंदर कुमार, जनरल मॅनेजर (चीफ ऑफ प्रोजेक्ट) सुब्रत मंडल, जनरल मॅनेजर (ए ओ डी) एस. बी चौधरी, जनरल मॅने...

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा - सचिव तुकाराम मुंढे

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मुंबई,दि.१ :- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.सचिव मुंढे म्हणाले,जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न व तक्रारी ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या उपाध्यक्षतेखाली विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारी, त्यावर घेण्यात आलेले निर्णय तसेच करण्यात आलेली कार्यवाही यांचा सविस्तर अहवाल आयुक्त,दिव्यांग कल्याण तसेच शासनास सादर करण्यात येणार आहे.बैठकीदरम्यान शासनस्तरावर निर्णय किंवा कार्यवाही आवश्यक असलेल्या मुद्द्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या द...