पोस्ट्स

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

इमेज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई मुंबई,दि.१४: मेट्रो लाईन४ श(वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे,यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत.अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.एमएमआरडीए प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा दिला.या दुर्घटनेची दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांचे निलंबनाचे निर्देश दिले.

णमोकार तीर्थ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ - मंत्री छगन भुजबळ

इमेज
णमोकार तीर्थ आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सवास मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती णमोकार तीर्थ हे केवळ मंदिर न राहता ते विश्वशांतीचा संदेश देणारे केंद्र बनेल - मंत्री छगन भुजबळ जगाच्या तणावाच्या परिस्थितीत शांतता निर्माण करण्यासाठी जैन समाजाचा अहिंसेचा विचार अधिक महत्वाचा - मंत्री छगन भुजबळ (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक,चांदवड  :- णमोकार तीर्थ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते मानवतेला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे.जैन धर्माने जगाला अहिंसा, सत्य,करुणा आणि संयम यांचा संदेश दिला आहे. आजच्या अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आजच्या या जगाच्या तणावाच्या परिस्थितीत जगात अहिंसा निर्माण होण्यासाठी जैन समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.णमोकार तीर्थ,आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा एवं महास्तकाभिषेक महोत्सव, मालसाने,ता.चांदवड, जि.नाशिक येथे आज मोक्षकल्याण, विश्वशांती महायज्ञ आणि समारोप सोहळा पार पडला.सोहळ्यास रा...

त्र्यंबकेश्वरला जाताय,शिवरात्री यात्रे निमित्त मंदिर ट्रस्टची महत्वाची माहिती

इमेज
विडीओ माहिती बघण्यासाठी लिंक क्लिक करावे त्रंबकेश्वर :- महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे खालील प्रमाणे निवेदन प्रसिध्द करण्यात येत आहे.श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी.महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी सकाळी ०४:०० वाजेपासून सोमवार दि.१६/०२/२०२६ रोजी रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहील.त्याकरिता पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल.भाविकांची श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता,कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरिता सर्व प्रकारचे व्हि.आय.पी. प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहे.त्याचप्रमाणे दि. १५/०२/२०२६ रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.दिनांक १४/०२/२०२६ ते १६/०२/२०२६ रोजी सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी १०:३० वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक गावकरी यांनी पश्चिम द्वाराने ओळखपत्र (आधारकार्ड) दाखवून प...

शिवजन्सोमोत्सव समितीच्या वतीने स्टेज भुमीपुजन संपन्न

इमेज
इंदिरानगर :- सर्वधर्मसमभाव सर्वपक्षीय एकजुटीने अशोक मार्ग,श्री.श्री.रविशंकर मार्ग नाशिक,येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने स्टेजचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास प्रभाग क्रं.२३ व ३० मधील नगरसेवका रुपाली निकुळे,सुप्रिया खोडे,मंगला नन्नावरे,संध्या कुलकर्णी,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,योगेश म्हस्के,प्रवीण जाधव, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक,माता-भगिनी तसेच मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या प्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अजिंक्य वहाडणे,उपाध्यक्ष प्रवेन गवारे, कार्याध्यक्ष महेश पाटील,खजिनदार साहिल पाटील,सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषिकेश चव्हाण,यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे परिश्रम घेतले.यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्तांनी आगामी शिवजन्मोत्सव सोहळा अधिक उत्साहात,शिस्तबद्ध पद्धतीने व सामा...

अभोणा ग्रामपंचायत नळपाणी योजना कामांची चौकशी करण्याची मागणी

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे कळवण :- अभोणा ग्रामपंचायत ने निकृष्ट दर्जाचे पाईप टाकल्याचा ग्रामस्थाचा आरोप,पाईप फुटल्याने परिसरात पाण्याची तळे तयार झाले आहे रस्ता बंद झाला.यात्रा उत्सव असल्यामुळे याबाबत सरपंच,ग्रामसेवक,यांना कळवूनही दखल न घेतल्याने परिसरातील रहिवासी तसेच भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनचे माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण,संतप्त झाले आहे.राज्य व केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही दर्जेदार काम होत नसल्याने कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.घटनास्थळावरील परिस्थिती दाखवत त्यांनी चित्रफीत रेकॉर्ड केली असून सीईओ तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली.

त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

इमेज
नाशिक,त्र्यंबकेश्वर :- महाकुंभ २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ संपन्न झाले.महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी आखाडे,महंत,साधू-संत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या सुविधांसाठी दर्जेदार व टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत,तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये,असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.याप्रसंगी महंत साधू-संत,आखाडा परिषदेचे पदाधिकारी,स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन यांच्या सहकार्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६ निश्चितच भव्य,सुव्यवस्थित व जागतिक दर्जाचा होईल,असा विश्वास मंत्री महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री.महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा),अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज,कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती,विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम,कुं...

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा. रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा. मुंबई,दि.२ :- पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ,स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा.शासकीय विभाग,विविध संस्थाबरो...