राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम राष्ट्रवादी भवन मुंबई नाका नाशिक येथे आनंदात संपन्न झाला.
नवीन वर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांतीचा साजरा केला जातो. नववधूंसाठी हा सण खास असतो. हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिला एकमेकांच्या घरी जाऊन वाण लुटतात यामागे आपल्या मैत्रिणीच्या नवर्याला उत्तम आयुष्य लाभून तिचा संसार सुखाचा होवो अशी शुभकामना असते. राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता ताई भामरे यांनी आलेल्या सर्व महिलांना वाण वाटले. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विधानसभा अध्यक्ष कुंदा सहाणे, मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, सातपूर विभाग अध्यक्ष अपेक्षा अहिरे, नाशिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर चिटणीस रजनी चौरसिया, संघटक संगिता पाटील, युवती शहर कार्याध्यक्ष ऐश्वर्या गायकवाड, कोमल गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment