दैनिक बालेकिल्ला मालेगाव 33वा वर्धापन दिन साजरा, अरुण दादा शिरोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

मालेगाव : दैनिक मालेगाव बाल्लेकिल्ला च्यावतीने गुणवंत व समाजसेवक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी समाजसेवक व प्रसिद्धी प्रमुख न्युज चे नासिक जिल्हा प्रतिनिधी  अरुण दादा शिरोळे
यांचाही पुरस्काराने देऊन गौरव करण्यात आला. 
प्रजासत्ताक दिनीच २६ जानेवारी रोजी दैनिक बालेकिल्ला यांच्या ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील अँड शिशीर हिरे डॉ सुगन बरट, जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, संपादक निवृर्ती बागुल, सुरजमल जैन, एकनाथ बागुल, आदी मान्यवर च्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमात विषेश उल्लेखनिय कार्य करणारे व्यक्तींना स्मुर्ती चिन्ह प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजसेवक वकिल अँड एल के निकम, योगप्रसारक स्वाती मराठे, बहुजन रयत चे अध्यक्ष कैलास वाळके, कोरोना काळात उलखनीय कार्याबद्दल सुमित पगारे, राजेंद्र लोंढे, मनोज जैन, शिवसेना मालेगाव महानगर प्रमुख अरुणा चौधरी, महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शक मनीषा महाजन, समाजसेवक शिक्षक भाऊसाहेब बच्छाव, मांगीतुंगी देवस्थान चे उत्कुष्ट कार्य डॉ सुरजमल जैन, निसर्ग संवर्धक डॉ पंकज निकम, संस्कार प्रसारक शिक्षक किशोर ठाकरे, पशुसंवर्धन डॉ जावेद हुसेन, प्राचार्य कैलास पवार, सामाजिक काशिनाथ वालखेडे, पोपट सुतार, अनिल चौधरी, गायिका भावना फोपळे, हर्षला रावळ , ज्ञानेश्वर बागुल,मे़ढपाळ समाजसेवक व प्रसिद्धी प्रमुख न्युज चे नासिक जिल्हा प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे, जितेंद्र महाले, सुशिला बोरसे, प्रगतशील शेतकरी रविंद्र पवार,आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपस्थितांचे स्वागत संपादक निवृत्ती बागुल, यांनी तर आभार विवेक बागुल, यांनी मानले. या सोहळ्याला विविध श्रेत्रातील मान्यवर मंडळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन