प्रजासत्ताक दिनानिमित्त कावनईत उद्या दिव्यांग भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण
कावनईचे सरपंच व ग्रामस्थ यांचा अनोखा उपक्रम.
घोटी प्रतिनिधी
स्वतंत्र भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी कुंभमेळ्याचे मूळस्थान असलेल्या कावनई ग्रामस्थ,सरपंच,ग्रामसेवक आणि सदस्य यांनी अनोखा उपक्रम आदर्श घालून दिला असून उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहनाचा मान गावातीलच दिव्यांग आणि विधवा महिलेला देण्याचा निर्णय झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की,देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येक स्वातंत्रदिनी आणि प्रजासत्ताक दिनी पूर्वाश्रमीचा तालुक्याचे ठिकाण असलेल्या कावनई गावासह लगतच्या ऐतिहासिक किल्ल्यावर महाकाय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते.यावर्षी ही कावनई ग्रामस्थ,ग्रामपंचायत ने ही परंपरा अखंडित ठेवली आहे.यावर्षी येथील ध्वजारोहणाचा मान गावातीलच दिव्यांग आणि विधवा महिला श्रीमती यशोदाबाई विष्णू शिरसाट या भगिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान कावनई ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सुनीता गोपाळ पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिनी गावातील ग्रामपंचायतच्या ध्वजाचे ध्वजारोहण जेष्ठ नागरिक,सैनिक, सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करण्याचा मान दिला आहे.कावनई ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या या आदर्श निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन(पाटील) गव्हाणे,उपाध्यक्ष सोपान परदेशी यांनी आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment