समाज सेवेचा ध्यास घेतलेला तरुण परिमल चव्हाण

नाशिक : नाशिक शहरातील मेरी म्हसरूळ परिसरातील परिमल चव्हाण धर्मरक्षित फाऊंडेशन चे संस्थापक गेल्या काही महिन्यापासून फाऊंडेशन च्यामाध्यमातून  सर्व मित्रांना बरोबर घेऊन समाजसेवेचे काम करत असून परिमलला लहान पणापासूनच  समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे अशी प्रचंड इच्छा, मग परिमल जमेल त्या मार्गाने मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले. कोणीही गरीब असाह्य व्यक्ती दिसली की यथाशक्ती अन्नदान करणे  हा त्यांचा नित्यक्रम झाला हे करित असतांनाच परिमल यांच्या दृष्टीस रस्त्यावरील परिसरातील बर्‍याच वर्षांपासून भटकंती करणारे मनोरुग्ण, किंवा कुटुंबाने नाकारलेले वयस्कर आज्जी आजोबा वयस्कर व्यक्ती नेहमीच दिसत असत आपण  त्यांच्यासाठी काही तरी करायला हव त्याकरिता सामुहिक शक्तीची लोकसहभागातून मदत करता येईल हा  विचार मनात ठेवून परिमल चव्हाण यांनी सहकार्यांना बरोबर घेऊन धर्मरक्षित फाऊंडेशन ची स्थापना केली.आणि त्यामाध्यमातून रस्त्यावर राहणार्‍या या आज्जी आजोबाना निवारा देण्याचे ठरले अणि यासाठी सर्व कसरत सुरू झाली. या सर्व उपक्रमात चव्हाण यांची साथ  सुख समृद्धी सेंटर चे डॉ. संतोष वैद्य, यांचे खूप मोलाचे सहकार्य धर्मरक्षित फाऊंडेशनला मिळाले. या रस्त्यावर राहणार्‍या लोकांना मनोरुग्ण आहे आपल्या वर हल्ला करिल असा विचार करून सगळे, घाबरतात त्यांच्यापासून दूर जातात अशा लोकांना जवळ करुन,त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत रस्त्यावर येण्याचे कारणाचा शोध घेत त्यांची सेवा करण्याचा समाजसेवेचा विडा या वयाने कमी असलेल्या परिमल चव्हाण ह्या तरुणाने घेतला आहे, प्रसिद्धी प्रमुख च्यावतीने संपुर्ण धर्मरक्षित फाउंडेशनच्या टिमचे अभिनंदन करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन