प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन, प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी

नाशिक : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे (पीएमएसएमए) आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. गरोदर मातांनी जवळच्या शहरी आरोग्य प्राथमिक  केंद्रात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाच्या एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) यांनी केले आहे. हे अभियान दर महिन्याच्या ९ तारखेला राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
मनपा  स्तरावर सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मनपा  स्तरावर माता व बाल संगोपन आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. या अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतीजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. 
केंद्र शासनामार्फत "प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान" या कार्यक्रमाचे पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत प्रामुख्याने खाजगी सोनोलॉजिस्ट तज्ञांचा सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. दुस-या व तिस- या तिमाहीत सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरुन, बालकांमध्ये असणा- या जन्मतः व्यंगाचे त्वरीत निदान करता येवु शकेल. तसेच अतिजोखमीच्या मातांवर योग्य ते औषधोपचार व आवश्यक असल्यास संदर्भसेवा देण्यात याव्यात. या अभियानांतर्गत प्रामुख्याने  खाजगी स्त्रीरोगतज्ञ / सोनोलॉजिस्ट / फिजीशियन तज्ञांचा सक्रिय सहभाग करुन घेण्याची सुचना आहे.

 माता मृत्यूच्या प्रमाणात घट 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील काही वर्षामध्ये राज्याने ग्रामीण भागातील माता व बालकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवामध्ये बरीच सुधारणा केलेली आहे. त्यामुळे राज्याच्या माता मृत्यूच्या प्रमाणात बरीच घट होण्यास मदत झालेली आहे. माता मृत्यू कमी करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु राज्यात अजुनही बरेचशे माता मृत्यू टाळता येवु शकतात. सुरक्षित मातृत्व हे मातृत्व आरोग्य सुधारण्याचे व माता मृत्यू कमी करण्याचे एक प्रभावी साधन आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन