नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचा सुरक्षा मुद्रणातील उत्कृष्टतेचा शतकपूर्ती सोहळा संपन्न
नाशिक :- इंडिया सिक्युरिटी प्रेसने (भारतीय सुरक्षा मुद्रणालय) 7 मार्च 2026 रोजी आपल्या स्थापनेचा शतकपूर्ती दिवस साजरा केला. शताब्दी सोहळ्याला अर्थ मंत्रालयाच्या सचिव (आर्थिक व्यवहार) अनुराधा ठाकूर, अपर्णा भाटिया, विजय रंजन सिंह, दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या सुचिता अनंत जोशी; आणि देवेंद्र कुमार रथ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अर्थ मंत्रालयाचे सचिव (आर्थिक व्यवहार), यांच्या हस्ते शताब्दी द्वार आणि शताब्दी उद्यानाच्या उद्घाटनाने या शताब्दी सोहळ्याची सुरुवात झाली. आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले.यावेळी त्यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शताब्दीनिमित्त एक विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले. सुरक्षा मुद्रणाशी संबंधित महत्त्वाची आणि सार्वभौम कार्ये पार पाडून, आयएसपी, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.एसपीएमसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंह यांनी नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस,या दोन युनिट्सच्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी नमूद केले...