पोस्ट्स

गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रात सुलभ व विश्वासार्ह व्यवस्था – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
महाराष्ट्रात ४४,७१० कोटींची गुंतव णूक  आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार  ७,०३० रोजगारनिर्मितीचा मार्ग मोकळा मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगसमूहांसाठी राज्य शासनाने सुलभ आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण केली असून गुंतवणुकदारांचा अनुभव पूर्णपणे अडथळामुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवन,मुंबई येथे उद्योग विभागाच्या वतीने आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार  करण्यात आले.यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगण, उद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार तसेच आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारांमुळे राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 7,030 रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्य शासनाने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी केली आहे.शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो,असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे.त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास श...

महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात सर्वांत मजबूत; २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’चे लक्ष्य मुंबई, दि. ११ :- राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत उत्तर देताना बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेत सुमारे ८४ सदस्यांनी सहभाग घेतला होता.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक स्थिती,कर्जाचे प्रमाण,सिंचन,वीज,उद्योग,पायाभूत सुविधा,जलजीवन मिशन,प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज ...

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा - मंत्री गिरीश महाजन

इमेज
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची आढावा बैठक मुंबई,दि.१० :- नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ,तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार असल्याने सर्व सुविधा नियोजनबद्ध, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार,भूमी अभिलेख उपसंचालक,निफाड व नाशिकचे उपविभागीय दंडाधिकारी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की,सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे भव्य प्रतीक आहे. देशभरातून तसेच जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून कामे प्राधान...

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

इमेज
जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ मुंबई,दि.१०:- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री च...

भांडवली बाजारातील ‘बॉण्ड’च्या माध्यमातून शहरांच्या विकासाला निधीचे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुंबई, दि. ९ :- महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो.नाशिक महापालिकेप्रमाणे ‘इनोव्हेटिव्ह फंड’निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते‘रिंगिंग बेल’वाजवून करण्यात आले.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप,नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान,मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी,नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नाशिक कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,नाशिक महानगरपालिकेने एकाच आर्थिक वर्षात प्रथम खाजगी प्लेसमेंट आणि आता सार्वजनिकरित्या ...

रेल्वे पोलीसांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे ना.रोड :- नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रवासी यांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी पुष्प देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले.महिला पोलीस,महिला आर पी एफ तसेच रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड  एपीआय सचिन बनकर,आर पी एफ इन्स्पेक्टर नविन प्रताप सिंह सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील,आर पी एफ हेमंत पठारे,आर पी एफ,जी आर पी स्टाफ उपस्थित होता.

सकल मराठा परिवाराच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

इमेज
नाशिक :- सकल मराठा परिवार तर्फे महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्य आधारित चला जगू या आनंदाने या विषयावर सत्कर्म फाउंडेशन च्या अध्यक्षा ज्योती भोसले-लांडगे,यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यात महिलांनी कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे आणि आपल्या आनंदाचा आणि भावनांचा रिमोट आपल्याच हातात ठेवावा असे त्या म्हणाल्या.या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा विषय अग्रभागी होता.महिलांचे आरोग्य,सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत महिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.'जिच्या हाती ज्ञानाची आणि कर्तृत्वाची दोरी,तीच घडवे नवी सृष्टी भारी'हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.एकंदरीतच,महिला दिनाचा दिवस केवळ शुभेच्छांचा दिवस न ठरता,स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ठरला.या प्रसंगी महिलानी उत्स्फूर्त पणे प्रश्न विचारले.उत्तरे जाणून घेतल्यानंतर प्रतिक्रिया आणि चर्चा करून समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर,स्नेहल काळे,अपूर...