कळवण येथे मोठ्या उत्साहात विराट हिंदू संमेलन संपन्न

PRASIDDHI PRAMUKH 
कळवण :- विराट हिंदू संमेलन,कळवण शहर समिती मार्फत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन दि.४ एप्रिल 2026 रोजी करण्यात आले.या संमेलनाच्या आदल्या दिवशी भव्य बाईक रॅलीचेही काढण्यात आली सपूर्ण कळवण शहर या निमित्ताने भगवेमय झाले.बाईक रॅलीत तसेच सर्वच कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.महिलांचे फेटे व पुरुषांचे भगवे टोप्या हे खास आकर्षण होते.हिंदू संमेलना प्रसंगी शोभा यात्रा काढण्यात आली.यात्रेची सुरुवात गांधी चौकातून होऊन भाजी मार्केट मार्गे बस स्थानक व मेनरोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फुलाबाई चौक,बाजार पेठ मार्गाने गांधी चौकात समारोप करण्यात आला.यावेळी ठिकठिकाणी फटाक्याच्या आतषबाजीने शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले.शोभा यात्रेनंतर हिंदू संमेलनास सुरुवात झाली.दीप प्रज्वलन,छत्रपती शिवाजी महाराज,भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन,तसेच आलेल्या मान्यवरांचे सुरवातीस औक्षण त्यानंतर प्रस्तावना करण्यात आली.प्रस्तावनेत संघ परिवार व हिंदू संमेलन चे उद्देश सांगण्यात आले.त्यानंतर सटाणा येथील गोसेवक मंगेश खैरनार यांनी हिंदुत्वाचे महत्त्व विषद केले.गोसेवा,राष्ट्रसेवा समाज सेवा यांचे महत्व विषद केले.मुख्य वक्ता संघ परिवार मालेगाव येथील धर्मजागरन प्रमुख चिरंजीव सानप यांनी आपल्या धारदार व ओघवत्या शैलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल.हिंदू हेच भाग्य विधाते असल्याने त्यांनी पंचसूत्रीचे पालन करावे हे सांगितले पंच सूत्री समजावताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघास १०० वर्ष पूर्ण होत आहे. या संघ शताब्दी निमित्ताने संघाने पंच सूत्रि चे अनुकरण करण्यास सांगितले आहे. त्या पंच सूत्रीत प्रथम सामाजिक समरसता समजावली सामाजिक समरसता म्हणजे आपण सर्व हिंदू एकच आहोत.आपल्यातील जातीपातीच्या भिंती तोडून आपण फक्त हिंदू आहोत म्हणून एकत्र आले पाहिजे.आपण सर्व सारखेच आहोत हे असंख्य उदाहरणासह पटवून दिले.तदनंतर नागरी शिष्टाचार,पर्यावरण प्रदूषण, स्व बोध,आदी विषय सहज व सोप्या भाषेत मांडले,त्या नंतर आसावरी ताई जोशी यांनी कुटुंब प्रबोधन हा विषय मांडताना मोबाईल पार्किंग, मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळणे सह कुटुंब भोजन,सहविचार,बंधू प्रेम,कुटुंब वात्सल्य,शेजार धर्म आदी गोष्टी रामायणतील प्रसंग प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे करून समजावून सांगितले. धर्मचार्य सह संयोजक ह.भ.प.कीर्तनकार समाधान महाराज पवार,चांदवड यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात संत परंपरा,सामाजिक समरसता रामायण,महाभारत काळातून कशी चालू आहे.विविध जातीचे संत त्यांनी जाती व्यवस्थेवर केलेले प्रहार व केलेले एकत्रीकरण,मातृ शक्ती म्हणजेच महिलांनी केलेले कार्य विविध उदाहरण देऊन रसाळ भाषेत पटवून दिले. त्यानंतर निवाणे येथील मनिषा दीदी यांनी आशीर्वाद दिले.आभार प्रदर्शन पसायदानाने सांगता करण्यात आली.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हजारोच्या संख्येने समुदाय जमला होता.विविध गणेश मंडळांचा सहभाग लक्षणीय होता.कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे समाजातील विविध घटकातल्या नवोदितांना बोलण्याची संधी देत कळवण शहरातत एक अभिनव उपक्रम राबवला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विराट हिंदू संमेलन कळवण शहर समितीने सर्व नियोजन केले.प्रसंगी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी