‘व्हर्टिगो’च्या त्रासातून व्हा मुक्त! अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष क्लिनिक
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे चक्कर येणे (Vertigo), तोल जाणे आणि संतुलनाशी संबंधित समस्यांवर अचूक निदान व उपचार देण्यासाठी विशेष ‘व्हर्टिगो क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक दर बुधवारी कार्यरत राहणार असून, न्यूरोलॉजी आणि कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सेवा उपलब्ध होणार आहे.या क्लिनिकचे नेतृत्व न्यूरोलॉजिस्ट डॉ.विशाल सावळे पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ.प्राची पवार आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.पंकज भट करणार आहेत.या उपक्रमामुळे चक्कर येणे, असंतुलन, डोके हलके वाटणे,कानातील समस्या किंवा मेंदूशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या त्रासाचे अचूक निदान आणि योग्य उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.यावेळी बोलताना डॉ. विशाल सावळे पाटील म्हणाले,“व्हर्टिगो ही अनेक कारणांनी उद्भवणारी समस्या आहे आणि तिचे योग्य निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदू,नसांशी संबंधित आजार किंवा रक्तपुरवठ्यातील बदल यामुळेही चक्कर येऊ शकते. या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना अचूक निदान आणि योग्य उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत.”डॉ. प्राची पवार यांनी सांगितले,“अनेक वेळा रुग्णांना चक्कर येणे ही सामान्य समस्या वाटते,परंतु त्यामागे गंभीर न्यूरोलॉजिकल कारणे असू शकतात. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. या क्लिनिकमुळे रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे.”डॉ. पंकज भट यांनी नमूद केले,
“व्हर्टिगोच्या अनेक केसेसमध्ये कानातील संतुलन यंत्रणेचा (inner ear balance system) संबंध असतो.ENT तपासणी,योग्य चाचण्या आणि विशिष्ट थेरपीद्वारे रुग्णांना जलद आराम मिळू शकतो.या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना संपूर्ण आणि समन्वित उपचार देऊ शकतो.”यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,“रुग्णांना विशेष आणि तज्ज्ञ उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे.‘व्हर्टिगो क्लिनिक’च्या माध्यमातून न्यूरोलॉजी आणि कान-नाक-घसा तज्ज्ञांचा एकत्रित दृष्टिकोन रुग्णांना मिळणार असून, त्यामुळे निदान आणि उपचार अधिक परिणामकारक होतील. भविष्यातही अशा विशेष क्लिनिक्सच्या माध्यमातून आम्ही रुग्ण-केंद्रित सेवा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.”अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे सुरू करण्यात आलेले ‘व्हर्टिगो क्लिनिक’ हे चक्कर येणे व संतुलनाशी संबंधित समस्यांवर अचूक,तज्ज्ञ आणि समन्वित उपचार देणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा