लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी मनपा कर्मचारी निलंबित,गुन्हा दाखल
नाशिक :- महानगरपालिकेच्या पंचवटीतील घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी मनीष जाधव यांनी करदाते व नाशिक महापालिकेची आर्थिक नुकसान करून सुमारे १८ लाख रुपयांचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून,सदर कर्मचाऱ्यावर मनपा प्रशानाकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.मनपा पंचवटी विभागीय कार्यालय अंतर्गत असलेल्या घनकचरा विभागात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने दि.१० सप्टेंबर २५ ते १९ जानेवारी २६ या कालावधीत मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची रक्कम रोख स्वरूपात स्वतःकडे ठेवून त्या बदल्यात नाशिक महानगरपालिकेच्या विविध भरणा केंद्रात स्वतःच्या नावे बँक खात्याचे चेक जमा करून पावती स्वीकारली हे सर्व चेक खात्यात पुरेशी रक्क्म शिल्लक नसल्याने न वटवता परत आल्याचे प्राथमिक चौकशी अंती आढळून आले आहे.निदर्शनास आलेल्या बाबी लक्षात घेता सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने स्वतःचे फायदया करिता शासनाची रक्कम रूपये १७,६३,२५१/- ची आर्थिक फसवणुक करून अपहार केला आहे.त्यावरून सहाय्यक अधीक्षक उदय खैरनार यांनी पंचवटी पोलिसात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याच्या विरोधात अपहार केल्या प्रकरणी भा.द.वी. ३१६ (४) व ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या वतीने निलंबित करण्यात आले आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने करदात्यांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिकांनी त्यांचा कर भरणा हा विभागीय कार्यालय अथवा उप कार्यालयातील भरणा केंद्रात जाऊन,स्वत: भरणा करुन,भरणा केलेल्या रकमेची पावती प्राप्त करावी.नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी यांचेकडे रोख रक्कमेचा भरणा सुर्पद करण्यात येऊ नये,अन्यथा त्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेची रहाणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा