Posts

येवल्यातील व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांचा छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनला पाठींबा

Image
व्यापारी गटाचे भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे अर्जुन ढमाले यांच्याकडून छगन भुजबळ यांच्याकडे पाठींबा पत्र सुपूर्त नाशिक:-(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपमुख्यमंत्री येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले व्यापारी गटाचे उमेदवार भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे उमेदवार अर्जुन ढमाले यांनी आज छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला पाठींबा देत असल्याचे पत्र दिले. यावेळी छगन भुजबळ यांनी दोनही उमेदवारांचे स्वागत करून त्यांना पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दिलेल्या संमती पत्रात म्हटले आहे की, आम्ही येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहोत. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने मोठ यश संपादन केल आहे. येवल्याच्या विकासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आ...

मनपा मुख्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)  नाशिक महानगरपालिका मुख्यालयात आज दि. ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, करुणा डहाळे, नितीन नेर, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, नगर सचिव मदन हरीश्चंद्र, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, मुख्यलेखापरीक्षक उत्तमराव कावडे, उप मुख्य वित्तलेखा अधिकारी गुलाबराव गावीत, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, मयूर पाटील, नगर नियोजन विभाग उपसंचालक हर्षल बाविस्कर, कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल, संदेश शिंदे, गणेश मैड, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, रमेश बहिरम, स्वीय सहाय्यक दिलीप काठे, वाल्मिक ठाकरे, नितीन गंभीरे, हुसेन पठाण, विरसिंग कामे ...

१८ अधिकारी/कर्मचा-यांचा सेवापूर्ती निमित्त प्रशासनामार्फत सत्कार

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक महानगरपालिकेच्या दोन उपअभियंत्यांसह विविध विभागातील १८ कर्मचारी ३०एप्रिल २०२३अखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथील सभागृहात त्यांना आज सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. नगर सचिव मदन हरीश्चंद्र, मिळकत व्यवस्थापक जयवंत राऊत यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ झाला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोप देऊन कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगर नियोजन विभागातील उप अभियंता उद्धव गांगुर्डे यांनी कार्यकाळातील कामांना उजाळा देताना राजीव गांधी भवन निर्माण होत असतानाच्या आठवणी सांगितल्या. बांधकाम सुरु असताना सुपरव्हिजन केल्याचे सांगितले. यावेळी निवृत्त कमचा-यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. उप अभियंता उद्धव गांगुर्डे, मलनिस्सारण विभागातील उप अभियंता राजेश शिंदे, नाट्यगृह सुपरवायझर बाळासाहेब गिते, नाट्यगृह ऑपरेटर सुनिल कळसकर, घरपट्टी विभागातील लिपीक बापु भोज, वाहनचालक गोरखनाथ केदार, स्टाफ नर्स ऍलिस कदम, पंप ऑपरेटर राजेंद्र ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडले, टपाल कार्यालयांच्या माध्यमातून महिला सक्षमीकारणाचा मार्ग खुला

Image
नवी दिल्‍ली  : केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज दुपारी संसद मार्ग इथल्या मुख्य टपाल कार्यालयाला भेट देऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) खाते उघडले. टपाल कार्यालयाच्या सर्वसामान्य ग्राहक म्हणून त्या खिडकी जवळ आल्या आणि खाते उघडण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे एमएसएससी खाते उघडण्यात आले आणि खिडकी मधेच संगणकाद्वारे तयार केलेले पासबुक त्यांना देण्यात आले. यावेळी स्मृती इराणी यांनी टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि काही एमएसएससी आणि सुकन्या समृद्धी योजना खातेधारकांशी संवाद साधला. त्यांची ही कृती नक्कीच लाखो नागरिकांना पुढे येण्यासाठी आणि जवळच्या टपाल कार्यालयात आपले एमएसएससी आणि सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी प्रेरणा देईल. ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या’ स्मरणार्थ, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर केली होती. मुलींसह महिलांचे आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे. दोन वर्षांच्या कालावधीची ही योजन...

राजीव गांधी भवन येथे आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) रेन वॉटर हार्वेस्टिंगची उत्कृष्ट अंमलबजावणी केलेल्या सोसायट्यांना पुरस्कार देणार,गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीच्या बैठकीत निर्णय, कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याचे नियोजन मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक आज दि. २४ एप्रिल रोजी पार पडली. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. उपायुक्त (गोदावरी संवर्धन कक्ष) डॉ. विजयकुमार मुंढे यांनी प्रास्तविक केले. मनपाकडून प्लॅस्टिक बंदी मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे. ही मोहिम आणखी व्यापक करुन कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी बचत गटांमार्फत वेंडींग मशीन लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या पिशव्यांवर प्लास्टिक बंदीचा मजकूर आणि मनपाचा लोगो असणार आहे. तसेच पर्यावरणपूरक मित्र इमारत आणि पर्यावरणपूरक मित्र सोसायटी (मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेन्डली बिल्डिंग/सोसायटी) असे पुरस्कार मनपा देणार आहे. त्यासाठी मनपाच्या वेबसाईटवर गोदावरी संवर्ध...

धांद्री विविध का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड

Image
बागलाण : तालुक्यातील धांद्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या सभापती पदी बाळासाहेब पोपट चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली   बाळासाहेब चव्हाण यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे सोसायटीत रोटेशननुसार बाळासाहेब भामरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी दि.२५ मंगळवार रोजी सभापती पदाची निवडणूक होवुन एकमेव अर्ज बाळासाहेब चव्हाण यांचा आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दराडे यांनी कामकाज केले.त्यांनी सभापती पदी बाळासाहेब चव्हाण यांची निवड घोषित केली कामकाजात अहिरे,सचिव,जाधव,यांनी सहकार्य केले.निवड घोषित होताच दराडे यांनी सभापती बाळासाहेब चव्हाण यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी पॅनलचे नेते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, यांनी निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल संचालक मंडळ उपस्थितांचे आभार मानत नविन सभापती यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सुत्रसंचलन प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रशांत चव्हाण, यांनी केले यावेळी गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याना पुष्पहार अर्पण करण्यात आले फटाके फोडुन आनंदउत...

येवल्यात शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन, पॅनलचे नेते छगन भुजबळ यांनी साधला मतदारांशी संवाद

Image
येवला : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) येवला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ आज येवला येथील माऊली लॉन्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,संभाजी पवार, अरुणमामा थोरात, विश्वासबापू आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,महेंद्र काले, समीर देशमुख, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, गणपत कांदळकर, प्रवीण गायकवाड, राजेश भांडगे, राजाभाऊ लोणारी, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार किसनराव धनगे, वसंत पवार, संजय बनकर,रतन बोरनारे, अल्केश कासलीवाल, संजय पगार, सविता पवार, डॉ.मोहन शेलार, लता गायकवाड, पुष्पा शेळके, कांतीलाल साळवे, ॲड.बापू गायकवाड, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सचिन आहेर,...