पोस्ट्स

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार - मंत्री गिरीश महाजन

इमेज
मुंबई, दि.०६ :- बेंबळा सिंचन प्रकल्पातील कालव्याचे काम मिळवण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्या सुमित बाजोरिया, सतीश भोयर,अभय कुमार या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले. हा प्रश्न आमदार हरीष पिंपळे यांनी उपस्थित केला होता.या प्रकरणात तीन ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून शासनाची कामे मिळविल्याचा आरोप आहे.संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आला आहे.दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.मंत्री महाजन म्हणाले की,बेंबळा हा सिंचन प्रकल्प ७.२ टीएमसी क्षमतेचा आहे. सुमारे ५२ हजार ४२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे.या प्रकरणातील पहिले कंत्राटदार आहेत सतीश भोयर व अभय कुमार एन यांनी केलेल्या कामाची किंमत सुमारे ३ ...

वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका - मंत्री प्रताप सरनाईक

इमेज
शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे घेतल्याची निवेदनाद्वारे माहिती मुंबई, दि. ६ :-  राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य मागण्यांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही केली जाईल. शासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर वाहतूकदार संघटनांनी संप मागे घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च २०२२ पासून संपाची घोषणा केली होती. ई-चलन प्रणालीतील त्रुटी, मोबाईलद्वारे फोटो काढून दाखल केलेली चलने रद्द करणे, अपुरे पुरावे असताना दाखल झालेली दंडात्मक कारवाई रद्द करणे,दंड भरल्यानंतरही पोर्टलवर प्रलंबित राहिलेली चलने निकाली काढणे, एकाच दिवशी दाखल झालेली एकापेक्षा अधिक गुन्हे नोंदी रद्द करणे, वेग नियंत्रणाशी संबंधित चलनांबाबत पुनर्विचार करणे तसेच वाहतूकदारांसाठी मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे,अशा प्रमुख मागण्यांसाठी वाहतूकदार संघटनांनी संप पुकारला होता.मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, वाहतूकदार ...

अमरावतीमध्ये हनुमान गढी धार्मिक पर्यटन केंद्राची उत्कृष्ट निर्मिती करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता; नागपुरातील कल्याणेश्वर मंदिर परिसर विकास कामाचाही आढावा मुंबई,दि.५:- अमरावती शहरालगत हनुमान गढी परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या प्रस्तावित हनुमान गढी परिसर पर्यटन विकासासाठी १२१ कोटींच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत.या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे.संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले.बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आमदार रवी राणा,आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण दटके,मुख्य सचिव राजेश अग्रवाल,पोलीस महासंचालक सदानंद दाते, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,हनुमान ग...

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता मुंबई,दि.५ :- कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे,तर देशातून मोठ्या संख्येने भाविक घेत असतात.या परिसराचे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे.या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्यात यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा आहे, त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसराचा सुधारित १७० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गु...

जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार - मंत्री नितेश राणे

इमेज
दिघी बंदर विकासाचे सादरीकरण मुंबई, दि.५:- रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.मंत्रालयात आयोजित बैठकीत अदानी पोर्ट्सकडून दिघी बंदराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.बैठकीत बंदराच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. राज्यातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आगामी काळात जलवाहतूक हा उत्तम पर्याय ठरणार आहे.यावर सरकार विशेष भर देत तसेच दिघी बंदर हे केवळ मालाची ने-आण करण्याचे केंद्र न राहता, ते जागतिक स्तरावरील एक लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.राज्याच्या किनारपट्टीचा वापर करून दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी जलवाहतूक व्यवस्था सुधारण्यावर प्राधान्य दिले जाईल. यामुळे इंधनाची बचत हो...

शिक्षिका शोभा जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

इमेज
नाशिक :- निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद 2026 च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूर विद्यालयाच्या उपशिक्षिका शोभा शिवाजी जाधव,यांना प्रदान करण्यात आला.यावेळी मा.आ.सुधीर तांबे,शिक्षक आ. किशोर दराडे,आ.राजू मामा भोळे,पीएसआय चव्हाण साहेब (जळगाव) तसेच जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व मान्यवर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत छत्रपती शिवरायांचे व राजमाता जिजाऊंचे महान विचार आपल्या व्याख्यानातून जनमानसात पोहोचविण्याचे कार्याची दखल घेत श्रीमती जाधव यांना या पुरस्कार सन्मानित करण्यात आले.जाधव या सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका समन्वयक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून इंग्रजी विषयातील आधुनिक काव्यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम कॉलेजचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.ड...

नाशिकच्या मयूर शिंदेचे ‘सीए’ परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश

इमेज
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेत कार्यरत असलेले रामदास शिंदे यांचे सुपुत्र मयूर रामदास शिंदे याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.१ मार्च २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात मयूरने पहिल्याच प्रयत्नात ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून ‘सीए’ पदवी प्राप्त केली आहे.मयूरने आपले वाणिज्य शाखेचे उच्च शिक्षण नाशिक येथील नामांकित बी.वाय.के. (BYK) कॉलेज मधून पूर्ण केले. सीए होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि कठोर परिश्रम यावर भर दिला. सीए परीक्षेसाठी आवश्यक असलेली आर्टिकलशिप त्याने नाशिकमधील प्रसिद्ध सीए एस. एस. मुथा अँड कंपनी कॅनडा कॉर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. या काळात मिळालेला व्यावहारिक अनुभव व तांत्रिक ज्ञान मयूरच्या यशात अत्यंत मोलाचे ठरले. आपल्या यशाबद्दल बोलताना नवनियुक्त सीए मयूर शिंदे म्हणाले,“हे यश केवळ माझे नसून माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे फळ आहे. योग्य मार्गदर्शन,सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही.”मयूरच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नात...