Posts

त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधील१ कोटी ११ लाख रुपयांची मदत

Image
नाशिक, दि. २५ :- त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला.यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, सचिव तथा मुख्याधिकारी राहुल पाटील,लक्ष्मण सावजी, विश्वस्त रुपाली भुतडा,पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार,मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी उपस्थित होते.निवृत्त बँक अधिकारी दाम्पत्याची १० लाख रुपयांची मदत तत्पूर्वी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले,या निवृत्त दाम्‍पत्याने १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्थेच्यावतीने तज्ञ संचालिका रुपाली परेश कोठावदे,यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश,आर. के. ट्रेडिंगचे संचालक श्रीधर रामचंद्र कोठावदे (सटाणा जि. नाशिक) यांनी ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यम...

प्रभाग क्रमांक २० येथे सांज पाडवा कार्यक्रम संपन्न नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Image
ना रोड :- प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे यांच्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले.भावगीतांनी आणि भक्तीगीतांनी नागरिकांची मने जिंकली.यावेळी गणेश उत्सव आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या विजयादशमी उत्सव लकी ड्रॉ विजेत्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत बालगोपालांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात येवून नावे जाहीर करण्यात आली.तसेच विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली.नाशिक रोड विकास मंच संस्थापक गणेश कदम,आणि स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रिया गणेश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “सांज पाडवा स्वर प्रल्हादाचा” या भावगीते आणि भक्तीगीतांच्या कार्यक्रमात प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे,यांनी आपल्या मधुर वाणीने सादर केलेल्या गीतांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सखे चल ग सखे पंढरीला'' विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत,दोनच राजे इथे गाजले,एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर”तसेच “तुफानातले दिवे” “कव्वाली” यांसह अनेक भावगीते आणि भक्तीगीते सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.उपस्थित नागरि...

अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर उमटली आनंदाची झळाळी

Image
सिन्नर :- ठाणगाव येथील समर्थ सावली बाल संगोपन केंद्रात सकल मराठा परिवार तर्फे सामजिक बांधिलकी जपत दीपावली साजरी करण्यात आली. या उपक्रमात मुलांना फक्त वस्तू नव्हे तर आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श देण्यात आला. दिवाळीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलताना पाहून सर्व उपस्थित सदस्य भारावून गेले.तसेच सकल मराठा परिवाराच्या सदस्यांनी आश्रमातील मुलानं बरोबर काही वेळ घालून त्यांच्या बरोबर अल्पोहार करत त्यांच्या शी हितगुज केले.त्यांच्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.माता पित्यापासून दूर असलेल्या पाखरांना मायेचा ओलावा देण्यात आपला खारीचा वाटा असावा असे मत सकल मराठा परिवार चे आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो असे मत सगळ्या परिवाराने मांडले.याकार्यक्रमाचे आयोजन डॉ.विकास मेदगे,समाधान दळवी, दीपक कोरडे,महेश मुरकुटे,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास सकल मराठा परिवारचे अनेक सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी दत्ता काळे,यांनी आपले विचार मांडले तसेच खंडू आहेर,यांनी सर्वांचे आभार मानले.अनाथ आश्रमाचे संचालक जयराम शिंदे,यांनी आपल्या आश्रमाची महिति देत सकल मराठा परिवाराचे आभार मानले.कार्यक्र...

दिवाळी निमित्त दिव्यांगांना नाशिक प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किराणा किट वाटप

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- दिपावली सणोत्सवा निमित्त बाजारात उत्साहाचे वातावरण असताना समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना ही दिवाळी साजरी करता यावी यासाठी माजी राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने शहरातील गरजु दिव्यांगांना किराणा वाटप करण्यात आले,प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, यांनी दिवाळी निमित्त पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले,या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनिल भडांगे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा,उपजिल्हाध्यक्ष रूपेश परदेशी,प्रमोद केदारे,सुदाम श्रीसुंदर, ज्योत्स्ना सोनार,आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी

Image
दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती मुंबई, दि. २० : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे दलित वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जातात. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक विकासासाठी निधी देण्यात येतो. मागील काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून निधीची मागणी होत होती. उपलब्ध निधी आणि मागणी यामध्ये समतोल राखत, सामाजिक न्याय मंत्री  शिरसाट यांनी आमदारांना दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.हा निधी वितरित झाल्याने दलित वस्त्यांतील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

मोदीजी यांच्या वतीने दीपावली निमित्त शुभेच्छा संदेश

Image
प्रिय समाधान जी,  ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दीपावली आहे. भगवान श्री राम आपल्याला धार्मिकतेचे रक्षण करायला शिकवतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य देखील देतात. काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण याचे जिवंत उदाहरण पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने केवळ धार्मिकतेचे रक्षण केले नाही तर अन्यायाचा बदला देखील घेतला.  ही दिवाळी विशेष आहे कारण, पहिल्यांदाच देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये दुर्गम भागांचाही समावेश आहे, दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात, आपण अनेक व्यक्तींना हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होताना पाहिले आहे, आपल्या देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त करत आहेत. ही देशासाठी एक मोठी उपलब्धी आहे.  या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, अलिकडच्या काळात देशाने पुढील पिढीतील सुधारणांवरही काम स...

आ.देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत सांज सुरेल गीतांची मैफील संपन्न

Image
दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दिपालीनगर येथे सांज सुरेल गीतांचा मैफिल संपन्न (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २३ भाजप चे माजी नगरसेवक यशवंत निकुळे , माजी नगरसेविका रुपाली निकुळे,विनयनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने दिपावली सांच मैफिलीचे आयोजन जयप्रकाश छाजेड उद्यान येथे रविवारी (दि१९) सायंकाळी करण्यात आले होते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली),पार्श्वगायिका कुमारी खुशी भोजक, यांनी कानडा राजा पंढरीचा,चला जेजुरीला जाऊ, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, राधा ही बावरी आदींसह सुप्रसिद्ध भक्तीगीते भजन,हिंदी, मराठी गीते सादर करत रसिक श्रोत्यांची मने गायकांनी जिंकली.त्यांची गायक अर्जुन तांबे, गायिका मिनल धोडपकर,कीबोर्ड अनिल धुमाळ, तबला महेश धोडपकर,ऑक्टोपॅड देवानंद पाटील, प्रतीक पाटील यांनी साथ दिली.याप्रसंगी सूत्रसंचालन सचिन जाधव,यांनी केले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे या उपस्थित होत्या. या ठिकाणी सुसज्ज असे उद्यान उभार...