Posts

नोकरीसाठी कुठलाही शॉर्टकट नाही -गणेश न्यायदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर

Image
नाशिक - आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करावे लागणार आहे याचा विचार करून प्रयत्न आणि मेहनत घेऊनच यश मिळवता येते याचे भान ठेऊन अभ्यास केला तर यश निश्चित प्राप्त होते. आज नोकरी मिळवायची तर परिक्षेशिवाय पर्याय नसून . असे प्रतिपादन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्हायदे यांनी केले. जाखडी नगर येथील स्वा.वि.दा.सावरकर अभ्यासिका येथे सावरकर जयंती निमित्त अभ्यासिकेतील18 अभ्यासार्थींनी स्पर्धा परिक्षेत यश सपादन केलेल्या विद्यार्थी तसेच परिसरातील 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावरअभ्यासिकेचे संस्थापक तथा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,व्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी, अँड अमृत फडणवीस आदी उपस्थित होते.गणेश न्हायदे पुढे म्हणाले की, आज कोणीच शिक्षणात परिपुर्ण नाही, दररोज आपण नविन काही शिकत असतो.आज राजकारणची स्थीती पाहीली तर शिक्षण क्षेत्राकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. परंतू चंद्रकांत खोडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्...

नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित व्हावं – छगन भुजबळ

Image
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवलचा समारोप नाशिक मधील ट्रक टर्मिनलसह वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – छगन भुजबळ चालक विश्रांती गृहासह इतर प्रश्नांवर देशातील सर्व ट्रान्सपोर्ट चालकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज - छगन भुजबळ नाशिक  :- नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवल समारोप सोहळा आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावे...

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

Image
कदम कुटुंबीयांची फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन वाटचाल याचा विशेष आनंद - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या पुस्तकांतून सामाजिक विचारांची मांडणी - छगन भुजबळ नाशिक :-  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी  यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेवून कदम कुटुंब वाटचाल करीत आहेत. या सामाजिक विचारांची मांडणी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी त्यांच्या पुस्तकातून मांडली आहे,असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या मु.श.औरंगाबादकर सभागृहात नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी फ.मु.शिंदे, त्यांच्या पत्नी साहित्यिका प्रा. लीलाताई शिंदे, माजी आमदार पंकज भुजबळ, अनिल आहेर,जगन्नाथ ध...

ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्षपदी विलास वांगड

Image
पालघर : आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले आप विलास लक्ष्मण वांगड यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या विभागिय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. ट्रायबल फोरम हे संघटन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे.  वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे कोकण विभागात आनंद व्यक्त केला जात आहे.

लोक निर्माण बहुउद्देशीय संस्थेचा एक अनोखा उपक्रम कर्णबधिर व मतिमंद, मुलांसोबत सामान्य मुलांचा नृत्य अविष्कार

Image
नवीन नाशिक :  कर्णबधिर व मतिमंद मुले ही निसर्गाच्या देण्यावर खेद व्यक्त न करता त्यांचा स्वीकार करत त्यावर कल्पकतेने कशी मात करू शकतात हे या नृत्य कार्यक्रमाने सिद्ध करून दाखवले.राणे नगर राजीव नगर रोड येथील किशोर नगर सभागृह मध्ये नुकताच नृत्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सेलिब्रिटी गेस्ट मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती मामासाहेब ठाकरे, उपनिरीक्षक वाहतूक शाखा नाशिक धनराज पाटील,अभिनेते विशाल पाटील, डॉ.उल्हास कुटे, शिवसेना विभाग प्रमुख विनोद दळवी ,राष्ट्रवादी काँग्रेस नवीन नाशिक अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दिग्दर्शक भगवान देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सपकाळे , दिग्दर्शक विजय जाधव, माजी नगरसेविका छाया देवांग, चारुदत्त दीक्षित उपस्थित होते. पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अतिथी मनोगत सेलिब्रेटी गेस्ट शिल्पी अवस्थी यांनी यावेळी सांगितले की गेल्या दोन महिन्यापासून अध्यक्ष चंदन खरे हे माझ्या संपर्कात होते कठोर परिश्रम करून त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, कर्णबधिर...

कर्तुत्ववान नेतृत्व हेमलताताई बिडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
आंबेगण : जनसेवेचावसा घेत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य सेवेची बांधलकी जोपासत 'साधी राहणी उच्च विचारसरणी हे तत्व अंगीकारत कर्तुत्वाच्या बळावर जनमानसात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डांगसेवा मंडळाच्या अध्यक्षा म्हणजेच हेमलता विजय बिडकर. काही माणसं कर्तुत्वाने श्रीमंत असता आणि त्यांच्या कर्तुत्वाचा नेतृत्वाचा अभिमान हा जनसामान्यांनाही असतो. समाजाच्या सर्वच घटकांसाठी तळमळीने काम करीत असतांना कुठलाही मोठेपणा न बाळगता जनसामान्यात समरस होवून आपुलकी, आस्था, प्रेम आणि जिव्हाळा जोपासून आपल्यातील दातृत्व सिद्ध करणारी माणस खुप कमी असतात. अशी माणस ही समाजासाठी प्रेरक आणि नेतृत्वाची खरी गरज असतात. अशाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागातील कळवण, सटाणा, सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यातील भूमित लाभलेल्या अशाच सर्व समावेशक आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मा. हेमलता बिडकर आज त्यांच्या ७५ वा वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत. घरातच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याचा वारसा लाभलेला असतांनाही स्वत:चे कर्तुत्व आणि हिंमतीने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक येथील डांगसेवा...

राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीची रामकुंड अहिल्या घाट नियोजन बैठक संपन्न

Image
नाशिक :-  हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्त बैठक संपन्न.अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार केले प्रत्येक धार्मिक ठिकाणी मंदिरे बांधली,घाट मांडली, जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली बारव, विहिरी जनसामान्यांसाठी बांधून ठेवल्या, मज्जीद,धर्मशाळा, पानवटी तयार केली, इंदूर सारख्या ठिकाणी मावळ प्रांतात राजधानी स्थापन केली महेश्वरीला नर्मदेच्या कडेला घाट आणि मंदिर बांधली चांदवड सारख्या ठिकाणी रंगमहाल , तसेच नासिक जिल्ह्यात संपूर्ण जाण्या येण्यासाठी रस्ते गोरगरिबांसाठी या सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिल्या अशा या महान कर्तुत्वान प्रशासक महिला राजमाता हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा येत्या 31 मे रोजी व 1जून रोजी अहिल्या, घाट रामकुंड, या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यानिमित्त, अहिल्यादेवींनी बांधलेल्या  घाटावरती काशी विश्वेश्वर मंदिर बांधले त्या घाटावरती काशी विश्वेश्वराची दर्शन घेऊन व अहिल्या राम मंदिराचे दर्शन घेऊन बैठकीत सुरुवात केली यामध्ये सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. या...