Posts

मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
निलंगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत’ रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया लातूर : (समाधान शिरसाठ) कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, श्री...

अर्निका फाऊंडेशन जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारी संस्था

Image
नाशिक : अर्निका फाउंडेशन नाशिक हि संस्था जेष्ठ नागरिकासाठी काम करते. याच कार्याचा भाग म्हणून ज्येष्ठांचे आर्थिक पुनर्वसन या संकल्पनेतून ज्येष्ठांना देखील आर्थिकदृष्या स्वावलंबी होण्याची संधी मिळावी, हक्काचा निवारा मिळावा आणि त्यांनाही स्वाभिमानाने जगता यावे या हेतूने अर्निका फाउंडेशन नाशिक निराधार निराश्रित ज्येष्ठ नागरिकांसाठी कामाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करीत आहे. तरी या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी व यात सामील होण्यासाठी शारिरीक क्षमते प्रमाणे काम करण्याची तयारी असणाऱ्या व वय वर्ष 60 व 60 च्यापुढे असलेल्या निराधार निराश्रीत ज्येष्ठ नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा संजीवनी आनंदालय नाशिक हेरंब पुजा रेसिडेन्सी जुन्नरे नगर , बोधले नगर नाशिक पुणे रोड नाशिक  फोन नंबर  7028982912 7972556830

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी “मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक, नाशिक मध्ये बैठक

Image
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून १२ वर्षापूर्वी, “मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक”  योगेश परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले.  जगाच्या पाठीवर कोणतीही सरकारी यंत्रणा एकटी आपत्कालीन व्यवस्थापन करू शकत नाही, त्यामुळे खासगी स्वरुपात आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी समाजातील घटकांची जोड आवश्यक असते, याच संकल्पनेतून या पथकाची स्थापना करण्यात आली.  पथकाच्या सुरवातीला ३०० हुन अधिक स्वयंसेवक होते आणि त्यांच्या सहकार्याने आज पर्यंत विविध कार्यक्रम केले गेले, कोपरी पुलाची दुर्घटना, एलिफंटा गुहे जवळील तेल गळती, इंडिया बुल्स जवळील आगीवरील नियंत्रण, कोकणातील पूरपरिस्थितीत लोकांना मदत, दरड कोसळल्यावर मदत, गणपती विसर्जनावेळी जमाव नियंत्रण व इतर अशी असंख्य कामे या पथकाने आतापर्यंत केलेली आहेत. संस्थेच्या नवीन १५० कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून २ दिवसीय प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. ह्या शिबीरात बृहन्मुंबई महानगरात आज पर्यंत मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचे ४५० हून अधिक स्वयं...

अनाधिकृत वृक्षतोड विरोधात कारवाई, आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, साडेसात लाखांचा दंड वसुल

Image
नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. नवीन वर्षात मनपाच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन विभागातील वेगवेगळया आठ ठिकाणी अनाधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ७,५५,००० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिसस्टेशन पंप, मयुर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे.  शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुलं आई-वडिलांच्या ताब्यात

Image
नाशिक (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले आईवडिलांकडे सुखरूपरित्या परत, एकाच आठवड्यातील दुसर्‍या घटनेमुळे सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक. दोन दिवसांपूर्वी नाशिक मधील मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.   सोमवार दिनांक ६ फेब्रुबारी २०२३ रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून गेली होती. ही दोन मुले सख्खे भाऊ असून हे दोघे रात्री ८ वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये बसलेली होती. परंतु बसमधील चालक व वाहक यांना या दोन्ही मुलांनाबाबत संशय आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांना घेऊन निमाणी बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कांबळे यांचेकडे सुपूर्द केले. ही दोन्ही मुले शालेय गणवेशात अस...

मनपा हद्दीतील सर्व्हे नं. 866/1/1 विनय नगर येथील खाजगी मिळकतीवरील अनधिकृत विना परवाना बांधकामे जमिनदोस्त

Image
इंदिरानगर : नाशिक मनपाकडून आज दिनांक 07/02/2023 रोजी दुपारी 1.00 वाजेपासून या मोहीमेला सुरुवात झाली. मा. जिल्हा न्यायालय, नाशिक येथे सर्व अनधिकृत बांधकाम धारकांनी मनपा विरुध्द़ दावे दाखल केले होते. ते सर्व दावे मा. जिल्हा न्यायालय, नाशिक यांनी फेटाळून लावले आहे. त्याआधी नगरनियोजन विभागामार्फेत प्रथम व अंतीम नोटीस संबधीतांना निष्कासन खर्चासह देण्यात आलेल्या होत्या. सदरची मोहीम राबवितांना त्यामध्ये एकुण 14 ते 15 मिळकतीपैकी 9 मिळकती निष्कासीत करणेत आलेल्या आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त़ अतिक्रमण करुणा डहाळे, मनपाचे सहाही विभागीय अधिकारी अतिक्रमण पथकासह तसेच कार्यकारी अभियंता, नगरनियोजन विभाग, संजय अग्रवाल व त्याचे अधिपत्याखालील सर्व अभियंते यावेळी उपस्थित होते.  सदर मिळकती निष्कासीत करतांना कायदा व सुव्य़वस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिस आयुक्त़ यांनी सदरची बांधकामे निष्कासनासाठी पुरविण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्त़ांमध्ये 1 डी.सी.पी, 2 ए.सी.पी, 6 पोलिस निरिक्षक तसेच महिला व पुरुष 150 पोलिस बंदोबस्त़ तसेच मनपासाठी देण्...

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत "मैं भी डिजिटल ४.०" मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन, १७ फेब्रुवारीपर्यंत मोहीम सुरु राहणार

Image
नाशिक: ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ) केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेंतर्गत नाशिक शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना "मैं भी डिजिटल ४.०" मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे हे आहे. लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करतांना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे. याकामी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे.  एनयूएलएम विभागाशी संपर्क साधावा नाशिक शहरात दि. ०७ फेब्रुवारी २०२३ ते दि. १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत "मैं भी डिजिटल ४.०" नावाची मोहीम राबविणेत येत आहे. त्यानुसार पीएम-स्वन...