पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकच्या हॉटेल ट्रीट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शिवसेना युतीची नेत्यांकडून घोषणा

इमेज
*इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती* नाशिक,दि.२९ डिसेंबर :- इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या वतीने नाशिकमध्ये करण्यात आली.नाशिकच्या हॉटेल ट्रीट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.राष्ट्रवादी व शिवसना युतीच्या वतीने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी युतीची घोषणा केली.यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ,माजी खासदार समीर भुजबळ,माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर,शिवसेनेचे विजय करंजकर,सुर्यकांत लवटे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे,आमदार हिरामण खोसकर,विजय करंजकर यांनी य...

मतदार जनजागृती अभियानांतर्गत ५१०० नाशिक महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

इमेज
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६  नाशिक :- नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची शपथ देण्यात आली.या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्याची सामूहिक शपथ घेतली.सदर शपथेचे वाचन नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.आज मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या केंद्राध्यक्ष,तसेच अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कला मंदिर व पंचवटी येथील सदाशिव भोरे नाट्यगृह येथे करण्यात आले होते.या प्रशिक्षण सत्रांमध्ये सकाळ व दुपार सत्रात सह जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजीत नाईक,यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ...

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन बंद प्रशासनाचा निर्णय

इमेज
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  पुणे, दि.२७ :- श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला आहे, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे.राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजुर केला आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन,श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त,स्थानिक दुकानदार व श्री.भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने मंदिर ...

शिवगोरक्ष योगपीठ आयुर्वेद संस्थानात मोफत साथरोग संधीवात औषध उपचार शिबिर नाव नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
नाशिक :- पंचवटीतील अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपिठातर्फे शनिवारी (दि. ३ जानेवारी) मोफत संधीवात व साथीच्या आजाराबाबत आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात रुग्णांना मोफत औषधे देण्यात येणार आहे.शिवगोरक्ष योगपिठात होणाऱ्या या शिबिरात संधीवात आजारावर मोफत उपचार व औषधे देण्यात येतील.यासह साथीच्या आजाराबाबत (सर्दी, खोकला) मोफत तपासणी व औषधे देण्यात येणार आहे.या शिबिरात मुंबईच्या जोविस हॉस्पिटलचे डॉ.राज सातपुते, डॉ.ज्योती सातपुते,डॉ.संगीता जाधव,डॉ.प्रविण बुरम यांच्यासह त्वचारोग तज्ज्ञ कंचन सुथार, तेत्रतज्ज्ञ डॉ. उदय साकुरीकर यांच्यासह डॉ. प्रज्ञा देशमुख, डॉ. वर्षा देशमुख,डॉ.भारती चव्हाण, डॉ. भालचंद्र ठाकरे रुग्णांवर उपचार करणार आहे.यासह डॉ.प्रसाद अकोलकर,हे पंचकर्मबाबत दुपारी १२ ते १ पर्यंत सविस्तर माहिती देणार आहे.याचबरोबर निरामय क्लिनिकच्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी शिवगोरक्ष योगपिठाचे भगवान महाराज ठाकरे,शिवानंद महाराज, मच्छिंद्र साठे,ज्ञानेश्वर गोसावी,राजेंद्र मोगल, विकास निचित,सुरेश तावडे, दिलीप शेळके, गणपत शेळके यांच्यासह आश्रमाचे साधक परिवार परिश्र...

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज

इमेज
40 दिवसात तीन यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा नवा विक्रम (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज उत्तर महाराष्ट्रात प्रथमच,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे मानवी यकृताची हवाई मार्गाने यशस्वी वाहतूक करून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.वेळेवर नियोजन आणि अचूक समन्वयामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली.सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉर,तर कोल्हापूर ते नाशिक कार्गो एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांत यकृताची सुरक्षित व जलद वाहतूक करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एका गंभीर रुग्णाच्या जीवनात नव्याने आशेचा किरण निर्माण झाला.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली उपचार घेत असलेल्या, यकृत सिरोसिस व यकृताच्या कर्करोगाने त्रस्त दोंडाईचा, जि. धुळे, येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवीन जीवन मिळाले असून अवघ्या सा...

मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

इमेज
वीर बाल दिवसानिमित्त साहिबजाद्यांच्या शौर्याला नमन मुंबई, दि. २६ :-शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे.साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून,त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देत राहील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे वीर बाल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले.यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी किर्तन,कविता वाचन केले आणि वीर शहीद साहिबजादे ...

प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी - राज्य निवडणूक आयुक्त

इमेज
मुंबई,दि.२४ :- महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार असल्याने,त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.वाघमारे यांनी सांगितले की,महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्त...

नाशिक जिल्ह्यातील मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्यास मान्यता

इमेज
भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे समाधान मिळावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 23: नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटी 35 लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी,यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावी. भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थ स्थळी येण्याचे समाधान मिळायला पाहिजे, अशा पद्धतीने कामे करावी,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.या ठिकाणी 6 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील 24 कोटी 26 लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता 12 कोटी 9 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
‘ऋषभायन-२’ वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव व 'वृषभ कला' प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि.१९ :- ज्ञान,साधना,सुरक्षा आणि कृषी याबाबत महत्त्वपूर्ण विचारांद्वारे साहित्य,कला, संस्कृती आणि सभ्यता प्रगल्भ करणारा “असी, मसी और कृषी”चा जीवनमार्ग भगवान वृषभदेव यांनी दाखविला.जगाच्या कल्याणासाठी हे विचार व ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ऋषभदेवांचे विचार आहेत,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बोरिवली येथे ऋषभायन – २ या तीन दिवसीय वैश्विक सांस्कृतिक आणि वैदिक ज्ञान महोत्सव प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार संजय उपाध्याय,आमदार मनीषा चौधरी,माजी खासदार गोपाळ शेट्टी, एल.पी.सिंह,ललित गांधी तसेच जैन मुनी,शिख,बौद्ध आणि हिंदू धर्मगुरू देखील यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,पहिले तीर्थंकर,पहिले सम्राट,भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतिक भगवान ऋषभदेव आहेत.जगाला‘संस्कृती’ या संक...

येवल्यात मा खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला घवघवीत यश

इमेज
मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासावर येवलेकरांचा शिक्कामोर्तब – आमदार पंकज भुजबळ आगामी काळात येवल्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य - माजी खासदार समीर भुजबळ येवला,दि.२१ डिसेंबर:- येवला शहरात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब केले आहे.आगामी काळात येवला शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य असणार असून येवला शहर हे राज्यातील रोड मॉडेल शहर म्हणून विकसित करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदी राजेंद्र लोणारी यांचा ११६५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ११ व भाजपचे ३ असे महायुतीचे एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहे.या विजयानंतर माजी खासदार समीर भु...

उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअरलिफ्टद्वारे यकृत वाहतूक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकचा ऐतिहासिक टप्पा

इमेज
नाशिक :- उत्तर महाराष्ट्रात प्रथमच, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे मानवी अवयवाची हवाई मार्गाने यशस्वी वाहतूक करण्यात आली. वेळेवर आणि अचूक समन्वयामुळे ही ऐतिहासिक कामगिरी घडली, ज्यामुळे गंभीर रुग्णाच्या जीवनात नवीन आशा निर्माण झाली.ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एक ५१ वर्षीय पुरुष रुग्ण यांच्यावर करण्यात आली,जे यकृत सिरोसिस व यकृताच्या कर्करोगाने त्रस्त होते. वेळीच केलेल्या शस्त्रक्रियेने त्यांना नवीन जीवन मिळाले.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे जलदगतीने आरोग्यसेवेत उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, ज्यामध्ये समाविष्ट आहे:  - अत्याधुनिक सुविधा व तंत्रज्ञान पात्र आणि अनुभवी डॉक्टर व क्लिनिकल टीम  आणि अशा अनेक यशोगाथा,ज्या दर्जेदार आणि रुग्ण-केंद्रित सेवेचे उदाहरण आहेत.ही यशस्वी प्रक्रिया पार पाडणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. संदीप पाटील,डॉ. संदीप साबनीस,डॉ.शरण नारुटे,डॉ.सोहम दोशी, आणि डॉ.अमोल शिंदे,यांच्या परस्पर सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वी झाली तसेच अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी म्हणाले की ही ऐतिहासिक कामगिरी केवळ नाशिक...

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक - सचिव तुकाराम मुंढे

इमेज
मुंबई,दि.१९ :- बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ता, एकसमानता आणि सातत्य आणण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.राज्यातील विशेष शाळांमधील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘दिशा’ विशेष अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सर्व बौद्धिक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये दिशा पोर्टल,अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रणाली राबविणे बंधनकारक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.सचिव मुंढे म्हणाले, सर्व विशेष शाळांना ‘दिशा’ पोर्टलवर ऑनबोर्ड करणे, मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षण, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (आयईपी) व वैयक्तिक थेरपी कार्यक्रम (आयटीपी) तयार करणे, बहुसंवेदी अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे तसेच नियमित मूल्यमापन व पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुंबई शहर,उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या निर्णयामुळे राज्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या...

नाशिक महापालिकेत भाजपच्या शंभर पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार - निवडणूक प्रमुख आ.देवयानी फरांदे

इमेज
नाशिक :- भाजप कार्यालय वसंतसृती येथे महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,आमदार सीमाताई हिरे, मा.आ.बाळासाहेब सानप,विजय साने,लक्ष्मण सावजी,सुधारक बडगुजर,सुजाता करजगीकर,प्रशांत जाधव,नाना शिलेदार,तसेच सर्व ज्येष्ठ नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आ. देवयानी फरांदे,यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी फरांदे यांनी सर्वांशी संवाद साधत.येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचे लक्ष्य असल्याचे नमूद केले,आणि ते साध्य करण्यासाठी संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल,असा विश्वास व्यक्त केला.महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार,आमदार राहुल ढिकले,आमदार सीमाताई हिरे,मा.आ बाळासाहेब सानप,जेष्ठ नेते विजय साने,लक्ष्मण सावजी,मा.नगरसेवक सुधारक बडगुजर,सुजाता करजगीकर, प्रशांत जाधव,नाना शिलेदार,व इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्याचा ठाम विश्वास निवडणूक प्रमुख आ.देवयानी फरांदे यांनी यावेळी व्यक्त केला. वर...

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

इमेज
महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली.‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ.राजेश गवांदे,मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.उपस्थित होते.डच शिष्टमंडळात राजदूत मोरिसा जेरार्ड्स, वाणिज्य दूतावास जनरल नबिल तौआती उपस्थित होते. या भेटीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल चर्चा केली. तसेच व्यापार, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यावरही चर्चा झाली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या वापराला पाठिंबा देत आहे. नेदरलँड्सच्या सहभागातून मत्स्यव्यवसायासारखे अनेक क्षेत्र विकसित केले जाऊ शकतात''.परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी प्रणाली आणि साहित्य,प्रगत यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉन...

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी - राज्य निवडणूक आयुक्त

इमेज
मुंबई, दि. 19 :- महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी. त्याचबरोबर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुसज्ज ठेवावीत आणि मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली,त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.दिनेश वाघमारे यांनी सांगितले की,भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे.त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधावा.त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण,नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे न...

माजी नगरसेविका रुपाली निकुळे यांच्या प्रचारार्थ प्रभागात प्रचार पत्रकांचे वाटप

इमेज
इंदिरानगर :- प्रभाग क्रमांक २३ अ अनुसूचित महिला राखीव जागेवरून भारतीय जनता पक्षाकडून इच्छूक उमेदवार माजी नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे,यांच्या प्रचारार्थ प्रभागात पत्रकांचे वाटप.यावेळी मोठ्यासंख्येंने महिला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावत जोरदार घोषणाबाजी करत आपला पाठिंबा दर्शविला तसेच.रुपाली निकुळे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी माजी यशवंत निकुळे,प्रभागातील जेष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी सदस्य महिला आदींसह कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमुख्यमंत्री फडणवीस यांची आदरांजली

इमेज
नवी दिल्ली दि. १८:- जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले होते.आज दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात स्व. सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी आदरांजली वाहिली.रावल म्हणाले, जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हुबेहूब आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.त्यांची श...

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन - सचिव तुकाराम मुंढे

इमेज
दिव्यांग विवाहाबाबतचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्यासाठी शासनाचा पुढाकार मुंबई, दि. १८  :-दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून,अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात.दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते.या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे.सचिव मुंढे म्हणाले,दिव्यांग व्यक्तीचा विवाह ही पालकांच्या दृष्टीने जिकिरीची जबाबदारी बनते.अनेकदा विवाह टाळला जातो किंवा विजोड जोडीदार दिला जातो.विशेषतःदिव्यांग महिलांना महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर शासन,सामाजिक व स्वयंसेवी संस्था दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे...

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामास मिळणार गती - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

इमेज
नाशिक,दि.१८  :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने व्हीआयएल कंपनीने त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंडाच्या जल शुद्धीकरण व पुनरुज्जीवनासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण प्रकल्पाची तयारी केली असून संबंधित काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.त्र्यंबकेश्वरला वर्षभरात लाखो भाविक येतात. गर्दीच्या काळात कुंडातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खराब होते.आरोग्याच्या दृष्टीने विद्यमान 100 m³/hr ऐवजी  प्रस्तावित 300 m3 /hr क्षमतेच्या उपचार सयंत्रामुळे संपूर्ण कुंड आता 9 तासाऐवजी 3 तासात स्वच्छ करता येणे शक्य होणार आहे. पाण्याची गुणवत्ता आवास व शहरी कार्य मंत्रालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सातत्याने टिकवता येणार आहे.तसेच 25 वर्षांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी व्हीआयएल कंपनीची राहणार आहे.15 डिसेंबर 2025 रोजी व्हीआयएलने सादर केलेल्या सादरीकरणात  तांत्रिक तपशील,क्षमतावाढ, उपचार पद्धती आणि अंमलबजावणी रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे.प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून साइट हस्...

'महाराष्ट्र भूषण’ राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
मुंबई, दि. १८:- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’काळाच्या पडद्याआड गेला आहे,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे विचार जगभर पोहोचवले.त्यांच्या प्रदीर्घ योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.राम सुतार,यांनी महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या कलेला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवले.महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच आम्ही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेलो होतो.त्यावेळी झालेली त्यांची भेट शेवटची ठरली,असे उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.नर्मदा तीरावरील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा अश...

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा मुंबई,दि.१६:- लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषायांची आढावा बैठक पार पडली.या बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे,सचिव श्रीकर परदेशी, तसेच संबधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव,सचिव उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,शंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स...

शीत लहरीच्या प्रकोपात पशुपालकांनी काय करावे.. करू नये..

इमेज
सध्या थंडीचे प्रमाण वाढत असून याम शीत लहरीच्या प्रकोप्रात शेतकरी व पशुपालक यांच्या पशुधनाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी शीत लहरींपासून पशुधनाचा बचाव करणे आवश्यक आहे. शीत लहरींच्या प्रकोपाच्या तीव्रतेपासून संरक्षण करणे, अनुषंगिक आजार व मर्तुक नियंत्रीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त आहेत याविषयी जाणून घेऊया….. शीत लहरीमध्ये नवजात वासरे, कालवडी / गोऱ्हे / वगारी / रेडक / मेंढ्या व शेळ्यांचे करडं, आजारी पशुधन तसेच श्वसन संस्थेचे विकार असलेले पशुधन, दुभते पशुधन, अशक्त पशुधन हे उच्चतम जोखीम असलेले पशुधन आहे. शीतलहरीमुळे होणाऱ्या हायपोथर्मिया, फ्रॉस्ट बाईट, भूक मंदावणे, मोठ्या पशुधनात सांधे दुखी, कुत्र्यांच्या पिलात खोकला, श्वसन विकार आदिंवर उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत. काय करावे स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्यावत माहिती ठेवावी. वातावरणातील तीव्र बदलापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी. पशुधनाचा थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा निवारा चहू बाजूने आच्छादित करावा, पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर...

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

इमेज
मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ मुंबई,दि.१५ : मिरा–भाईंदर शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ही काळाची गरज होती.या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व गतिमान होईल.नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहन नोंदणी,वाहन परवाने, नूतनीकरण तसेच इतर सर्व परिवहन विषयक सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून, प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान होईल,असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.मंत्रालयातून दूर दृश्य प्रणालीद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा,परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते.मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यात एकूण ६० उपप्रादेशिक परिवहन कार्या...

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

इमेज
मुंबई, दि. 15:- बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथीगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील.सर्व महानगरपालिकांसाठी...

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार,उपचार नाकारल्यास कारवाई

इमेज
२३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मुंबई दि. १३: राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.उपचार पॅकेजच्या दरात वाढ करून रुग्णालयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. NABH व NQAS मानक पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना १० ते १५ टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.योजनेची प्रभावी अंमलबजावणी व तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास टोल फ्री कॉल सेंटर उपलब्ध असून, १५५३८८/ १८०...

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

इमेज
नागपूर,दि. १२: उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी 1200 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट,यांनी केले. शहरातील सेंटर पाईंट हॉटेल येथे सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवाद – देशाच्या भविष्याशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री संजय शिरसाट म्हणाले,विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ते प्रगती करू शकतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.या योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी लागणारे साहित्य तसेच सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा करण्यात येईल.वसतिगृहात वातावरण निर्मितीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात...

वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना संचालक कार्यालयाकडून निरोप

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नागपूर, दि. १२ :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना आज नागपूर-अमरावती माहिती संचालक कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सेवानिवृत्तीपूर्व निरोप देण्यात आला.  गेल्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अष्टपुत्रे ३१ डिसेंबर २०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. या औचित्याने नागपूर माहिती संचालक कार्यालयात अनौपचारिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एकूण सेवेपैकी जवळपास अर्धा कालावधी एकूण ६ मुख्यमंत्री आणि १ उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रभावीपणे कार्य करणारे श्री. अष्टपुत्रे यांच्यासोबत प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हा माहिती अधिकारी व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुख्यालयात वृत्त शाखेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे.यावेळी अनुक्रमे वर्धा,अकोला आणि नागपू...