अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये ५०० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण
नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागाने ५०० यशस्वी इंटरव्हेन्शनल प्रक्रियांचा (IR Procedures) महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अमोल भालेकर, यांच्या कौशल्यपूर्ण कार्याला जाते.या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक शाखा असून,मोठी शस्त्रक्रिया न करता सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्याने आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली (CT, Ultrasound, Angiography) उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी धोका आणि जलद पुनर्वसन याचा मोठा फायदा होतो.या ५०० प्रक्रियांमध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजवरील उपचार,ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोस वेन्स उपचार,बायोप्सी,ड्रेनेज प्रक्रिया, डायलिसिस कॅथेटर बसविणे,तसेच विविध अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या मिनिमली इन्वेसिव्ह प्रक्रियांचा समावेश आहे.अत्याधुनिक उपकरणे,अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तज्ज्ञ टीम या...