पोस्ट्स

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५११ असाक्षर व्यक्तींच्या सहभाग

इमेज
नाशिक :- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर पार पडल्या.त्यात १५११ असाक्षर व्यक्तींनी सहभाग नोंदविला.केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत रविवार,दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.००ते दुपारी ५.०० या वेळेत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLNAT) चाचणी घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण १५११ असाक्षर व्यक्ती सहभागी झाल्या असून,ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षा केंद्रावर २२४ केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली होती.तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहे.मनपा प्रशासनाच्या वतीने व मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहभागातून ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे. डॉ. मिता चौधरी - प्रशासनाधिकारी म...

प्रशासनात पारदर्शकतेचा नवा अध्याय! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला 'त्रिसूत्री'चा मंत्र

इमेज
प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई, दि. २८ : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य ...

महाराष्ट्रात आता उद्योगांची चांदी! परवानग्या होणार सुलभ आणि वीजदरही घटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

इमेज
उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ व ‘लाइफ सायन्सेस हब’उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ,उद्योग प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन,वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना विश्वासपूर्वक सांगितले की,राज्यातील वीजदर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत.सध्या असलेला ₹10.88 प्रति युनिट हा वीजद...

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.२७ :- जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे ना...

लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

इमेज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू  मुंबई :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.महायुती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.   मंत्री अदिती तटकरे  महिला बालविकास 

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

इमेज
पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक,दि.26मार्च2026 :- जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व वितरकांनी समन्वयाने कार्य करावे. कोणत्याही आफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अनावश्यक गर्दी व इंधन साठेबाजी टाळून संयम बाळगावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडर वितरक,कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री महाजन बोलत होते.यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह विविध तेल कंपन्या,गॅस वितरक यांचे प्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते.मंत्री महाजन म्हणाले की,सध्या पेट्रोल-डिझेलची मागणी दीडपट वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती कृत्रिम टंचाईची परिस्थि...

वाडीवऱ्हे बजाज इलेक्ट्रॉनिक्स कामगार प्रश्न मार्गी लागणार? कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे ३१ मार्चपर्यंतचे मोठे निर्देश!

इमेज
मुंबई, दि. २४ :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील मे.बजाज इलेक्ट्रॉनिक्स लि. मधील कामगारांच्या स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाचा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला.कामगारांवर अन्याय होऊ नये,यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधींनी आपले लेखी म्हणणे ३१ मार्चपर्यंत सादर करावे, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बैठकीत दिले.फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती.संबंधित कामगारांकडून सक्ती झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून,व्यवस्थापनाने सध्याच्या परिस्थितीत मूळ पदांवर काम उपलब्ध नसल्याने पर्यायी स्वरूपात इतरत्र काम देण्याची तयारी दर्शविली आहे.कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असून, सर्व बाबींचा विचार करून न्याय्य निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आकाश फुंडकर यांनी नमूद केले.बैठकीस आमदार सीमाताई हिरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार आयुक्त डॉ एच पी तुम्मोड तसेच संबंधित अधिकारी,कामगार प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब...