पोस्ट्स

जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार - मंत्री नितेश राणे

इमेज
दिघी बंदर विकासाचे सादरीकरण मुंबई, दि.५:- रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.मंत्रालयात आयोजित बैठकीत अदानी पोर्ट्सकडून दिघी बंदराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.बैठकीत बंदराच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. राज्यातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आगामी काळात जलवाहतूक हा उत्तम पर्याय ठरणार आहे.यावर सरकार विशेष भर देत तसेच दिघी बंदर हे केवळ मालाची ने-आण करण्याचे केंद्र न राहता, ते जागतिक स्तरावरील एक लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.राज्याच्या किनारपट्टीचा वापर करून दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी जलवाहतूक व्यवस्था सुधारण्यावर प्राधान्य दिले जाईल. यामुळे इंधनाची बचत हो...

शिक्षिका शोभा जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

इमेज
नाशिक :- निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषद 2026 च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूर विद्यालयाच्या उपशिक्षिका शोभा शिवाजी जाधव,यांना प्रदान करण्यात आला.यावेळी मा.आ.सुधीर तांबे,शिक्षक आ. किशोर दराडे,आ.राजू मामा भोळे,पीएसआय चव्हाण साहेब (जळगाव) तसेच जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व मान्यवर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत छत्रपती शिवरायांचे व राजमाता जिजाऊंचे महान विचार आपल्या व्याख्यानातून जनमानसात पोहोचविण्याचे कार्याची दखल घेत श्रीमती जाधव यांना या पुरस्कार सन्मानित करण्यात आले.जाधव या सकल मराठा परिवार दिंडोरी तालुका समन्वयक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून इंग्रजी विषयातील आधुनिक काव्यावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.मराठा विद्या प्रसारक समाजाचे केटीएचएम कॉलेजचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.ड...

नाशिकच्या मयूर शिंदेचे ‘सीए’ परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश

इमेज
नाशिक :- नाशिक महानगरपालिकेत कार्यरत असलेले रामदास शिंदे यांचे सुपुत्र मयूर रामदास शिंदे याने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.१ मार्च २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात मयूरने पहिल्याच प्रयत्नात ही अत्यंत कठीण समजली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करून ‘सीए’ पदवी प्राप्त केली आहे.मयूरने आपले वाणिज्य शाखेचे उच्च शिक्षण नाशिक येथील नामांकित बी.वाय.के. (BYK) कॉलेज मधून पूर्ण केले. सीए होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि कठोर परिश्रम यावर भर दिला. सीए परीक्षेसाठी आवश्यक असलेली आर्टिकलशिप त्याने नाशिकमधील प्रसिद्ध सीए एस. एस. मुथा अँड कंपनी कॅनडा कॉर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. या काळात मिळालेला व्यावहारिक अनुभव व तांत्रिक ज्ञान मयूरच्या यशात अत्यंत मोलाचे ठरले. आपल्या यशाबद्दल बोलताना नवनियुक्त सीए मयूर शिंदे म्हणाले,“हे यश केवळ माझे नसून माझ्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे फळ आहे. योग्य मार्गदर्शन,सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही.”मयूरच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नात...

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

इमेज
मुंबई,दि.३ :- आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.तसेच केंद्र सरकारसोबतही समन्वय ठेवून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित दूतावास,परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या संपूर्ण समन्वय कार्यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्र शासनाला सर्वतोपरी मदत केली जात असून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने मदतीसाठी एक विशेष व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. आखाती देशांमध्ये अडचणी...

शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

इमेज
बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव मुंबई दि. ०२:- पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण ‘स्व.अजित (दादा) पवार’यांच्या नावाने करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या 3 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 रुग्णखाटांचे संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.त्यानंतर 20 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व 100 रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालयही सुरू करण्यात आले.या दोन्ही संस्था ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्यकेंद्र ठरली आहेत.येथे विशेषज्ञ वैद्यकीय सेवा,आपत्कालीन उपचार,शस्त्रक्रिया सुविधा तसेच आयुर्वेद उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहेत.परिणामी,पुणे शहरावरील तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा ताण कमी होऊन परिसरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व ...

पोलीसांनी गस्ती दरम्यान गुन्ह्यातील चोरट्याला घेतले ताब्यात

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिकरोड :- रेल्वे पोलीस ठाणे तील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील, व पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळे,आर पी एफ आरक्षक कृष्ण यादव,नाशिक रोड यांची पुन्हा एकदा नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीतील धडाडीची कामगिरी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे कॉन्स्टेबल के के यादव यांचे सह गुन्हेगारांवर वॉच व गुन्ह्यास प्रतिबंधक करणे करिता गस्त करत असताना गु र नंबर 224/25 मधील आरोपीत नामे अर्जुन उर्फ अरुण काळ्या संजय पवार राहणार सुभाष रोड नाशिक रोड नाशिक हा संशयित रित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे मध्ये दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 कलम 305 सी मधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 15000हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून सदर आरोपीत हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांचे मोबाईल व सामान चोरी करत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्याकडे अजून चौकशी करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी ही लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर येथील माननीय पोलीस अधीक्षक...

वणी येथे अल्पवयीन मुलगी माथेफिरू तरुणाच्या छळाचा बळी

इमेज
गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपची मागणी दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील वणी येथे एक अल्पवयीन हिंदु मुलगी लव्ह जिहादची बळी पडली असून मागील चार वर्षांपासून एक मुस्लिम युवक तिला मानसिक त्रास देत होता.अखेर या कुटुंबाने वणी येथुन नाशिकला स्थलांतर केले तरी सुध्दा या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई वडील व भावाला त्रास सुरूच राहीला.माझ्याबरोबर लग्न कर नाही तर तुझ्या आई वडिलांचा खुण करू अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती.मुलीने अखेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये ती वाचली.सदर मुलगी हुशार असुनही केवळ भितीपोटी मुलीच्या आई वडिलांनी तिला १२ वी परीक्षेत बसु दिले नाही व घरातच ठेवले.या मुस्लिम कुटुंबांचा अवैध दारू व गुटख्याचा मोठा धंदा असुन केवळ भितीपोटी स्थानिक कोणीही पुढे येत नाही.भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे जेव्हा या मुलीच्या आई वडिलांनी तक्रार केली तेव्हा चक्र फिरले व गुन्हा दाखल झाला.या प्रकरणात वणी पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी सहभागी असुन गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी त्या गुन्हेगाराला सावध केले.व त्याला परर...