Posts

Showing posts from August, 2019
Image
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ( प्रतिनिधी पेठ ) दिनांक ३०/०८/२०१९ नायाब तहसिलदार पेठ तहसिल  बाळासाहेब भाऊराव नवले याने वडलोपार्जित शेत जमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण निकाली काढण्याकरीता सहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता शेतकरी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संपर्क साधत सदर घटनेची माहीती दिली असता लाचलुचपत विभाग नाशिक यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर नायाब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले   पेठ तहसिल कार्यालय नाशिक याला कार्यालयात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले पेठ पोलिस ठाण्यात गुण्हा दाखल करण्यात आला.

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख

Image
( साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ) राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी नवी दिल्ली, दि.29/08/2019 व्यावसायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) कायद्यात सुधारणा करून एकूण उपलब्ध निधीच्या 0.25 टक्के निधी वनक्षेत्र विकासासाठी वापरणे अनिवार्य करण्यात यावे, अशी सूचना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज  येथे आयोजित राज्यांच्या वनमंत्र्याच्या परिषदेत केली. या बैठकीत केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वाट्याचा ‘वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणातील’ (कँपा) 3 हजार 844 कोटी रुपयांचा धनादेशही मुनगंटीवार यांनी स्वीकारला. इंदिरा पर्यावरण भवन येथे आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या वनमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रालयाचे राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध राज्यांचे वनमंत्री या बैठकीस उपस्थित होते.  राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेही यावेळी उपस्थित हो...

साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख नाशिक जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान

Image
प्रतिनिधी नाशिक 03/08/2019 सर्व नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की खालील प्रमाणे धरणातून विसर्ग सुरू आहे...5 वाजता.. गंगापूर 17748 क्यूसेस गौतमी गोदावरी 6225 क्यूसेस आनंदी 687 क्यूसेस दारणा 23192 क्यूसेस भावली 1509 क्यूसेस वालदेवी 502 क्यूसेस नांदूर मधमेश्वर 83773 क्यूसेस पालखेड 6068 क्यूसेस चनकापूर 7307 क्यूसेस पुनद 2895 क्यूसेस हरणबरी 56 क्यूसेस होळकर पूल 20375 क्यूसेस ( धोका पातळी) वरील प्रमाणे विसर्ग सुरू आहे सर्व नागरिकांनी सतर्क रहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तात्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी , पुलावर गर्दी करू नये तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. सूरज मांढरे भाप्रसे जिल्हाधिकारी नाशिक