Posts

कुंभमेळ्यात नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी - मुख्य सचिव राजेशकुमार

Image
विकास कामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश नाशिक,दि.८ :- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभेमळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभपर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भुसावळ) पुनीत अग्रवाल,नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्...

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

Image
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरीवर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५ एचपीपर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मार्च २०२४ अखेर ४७ लाख ४१ हजार इतके कृषी पंप ग्राहक असून या ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे ३० टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दश लक्ष युनिट आहेत. प्रामुख्याने या विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जून २०२४ महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात उप...

अमृत दुर्गोत्सवात नाशिककरांनी सक्रिय सहभागी व्हावे - मनिषा खत्री मनपा आयुक्त नाशिक

Image
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा सन्मान दिल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाच्या “अमृत महाराष्ट्र” या स्वायत्त संस्थेतर्फे “अमृत दुर्गोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.या दुर्गोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांना विश्वविक्रमी मानवंदना देण्याचे उद्दिष्ट आहे. या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री,यांनी नाशिककरांना आवाहन केले आहे की“प्रत्येक घर, सोसायटी, अपार्टमेंट अथवा मोकळ्या जागेत गडदुर्गांची प्रतिकृती साकारून या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रमात सहभागी व्हा.”या गडदुर्गांच्या प्रतिकृती www.durgotsav.com या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेद्वारे अपलोड करता येतील. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबासह यात सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.नाशिक ही कुंभ नगरी म्हणून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची अनेक दुर्गस्मृती येथे जिवंत आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या ...

रेल्वे पोलीस, सुरक्षा बल संयुक्त राष्ट्रीय एकता दौड

Image
रेल्वे पोलीस,सुरक्षा बलाच्या वतीने एकता दौड विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक रोड :- रन फॉर युनिटी कार्यक्रमा करिता रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड व रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड असे संयुक्त रिक्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेऊन रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथून एकता दौड सुरुवात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,देवी चौक पुन्हा रेल्वे स्टेशन नाशिक रोड येथे एकता दौडची सांगता झाली.सदर कार्यक्रमा दरम्यान वसंत भोये,उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड, रे.पो. स्टे. नाशिक रोड येथील API सचिन बनकर, व 15 अंमलदार व RPF निरीक्षक नवीन प्रताप सिंह व RPF कर्मचारी 34, रिटायर्ड स्टेशन मास्तर आर्या साहेब तसेच रेल्वे रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर खडताळे, व रिक्षा चालक,आदी उपस्थित होते.

दुबार नावाबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Image
मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश मुंबई, दि. 29 (रानिआ): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी,असे निर्देश सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाने आज दिले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहाय; तसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजीत केली जाते. या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारुप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नाव...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Image
नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ - मुख्यमंत्री सातारा, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. फलटण येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. फलटण ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त क...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, शुभारंभ

Image
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक - उपमुख्यमंत्री पुणे, दि. २६ : देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून, या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे कार्य केवळ पर्यावरण संवर्धनाचेच नव्हे तर आपल्या श्रद्धेचेही आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उ...