पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक श्रवण दिनानिमित्त बालकांमधील ऍडेनॉईड व टॉन्सिल समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक - डॉ. पंकज भट

इमेज
नाशिक :- ३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने बालकांमधील ऍडेनॉईड हायपरट्रॉफी आणि टॉन्सिलायटिस या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या समस्यांबाबत पालकांनी सजग राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट यांनी केले आहे.या आजारांचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास मुलांच्या श्रवणशक्तीवर,श्वसनावर तसेच एकूण आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. डॉ.भट यांनी सांगितले की,ऍडेनॉईड हायपरट्रॉफी म्हणजे नाकाच्या मागील भागातील ग्रंथींची असामान्य वाढ होणे,तर टॉन्सिलायटिस म्हणजे घशातील टॉन्सिलला सूज आणि संसर्ग होणे.हे दोन्ही आजार विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.तोंडाने श्वास घेणे,झोपताना घोरणे (स्नोरिंग),वारंवार घसा दुखणे, ताप येणे, सतत सर्दी-खोकला होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. अनेक वेळा मुले झोपताना किंवा खेळताना तोंड उघडे ठेवून श्वास घेताना दिसतात. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, दिवसभर थकवा जाणवतो आणि शालेय कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कानाचे वार...

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री करिता आर्थिक सहाय्य

इमेज
मुंबई, दि. २८ :- दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री (टूलकिट) खरेदीसाठी कमाल १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.पूर्वी या योजनेद्वारे एक हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते. हे अर्थसहाय्य पुरेसे नसल्याने व प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता या योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे,याबाबतचा दिव्यांग कल्याण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास मोठी मदत होणार आहे.दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.अनेक दिव्यांग व्यक्ती कौशल्याधारित व्यवसाय जसे की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्यूटी पार्लर,इलेक्ट्रिकल कामे,सुतारकाम,वाहन दुरुस्ती,किरकोळ व्यवसाय इत्यादी...