कुंभमेळ्यात नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी - मुख्य सचिव राजेशकुमार
विकास कामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश नाशिक,दि.८ :- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा कुंभेमळा हा नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे आध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने सिंहस्थ कुंभपर्व यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेल्या विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार (विशेष), विभागीय आयुक्त तथा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (भुसावळ) पुनीत अग्रवाल,नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्...