Posts

युवासेनेचा दिंडोरीत युवा विजय दौरा

Image
दिंडोरी :- युवासैनिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी युवा विजय दौरा दिंडोरी येथे पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख भाऊलालजी तांबडे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेकदादा चौधरी, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेशभाई अभंगे, स्वराज पाटील, ओमकार पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख वैभवदादा महाले, विधानसभा प्रमुख अतुलदादा वाघ, तालुकाप्रमुख अमोलजी कदम, दिंडोरी शहर प्रमुख सुरेशशेठ देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख कृष्णा देशमुख, शहरप्रमुख रोहित घोरपडे, उपजिल्हाप्रमुख कैलास गामणे, अभिजीत गोजरे, तालुका संघटक अंकित देशमुख, उपजिल्हा संघटक सागर पवार, उपतालुकाप्रमुख रोशन लगड, आदित्य दवंगे, शाखाप्रमुख किरण देशमुख, अक्षय तासकर, अनिकेत गाडे, उपशाखाप्रमुख गुरु पगार, सोहम घाटगे, दर्शन उगले, वरून महाले, सोनू चौधरी, मयूर देशमुख, रोशन संधान, संकेत देशमुख, श्रेयस पिठे, कृष्णा देवरे, रोहित पगार, ओम घाटगे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवासेनेच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लखमापुर फाटा: युवासेना...

‘मराठा मंच’कडून ''शिवगौरव :२०२५'' या पुरस्काराणे खंडू आहेर सन्मानित

Image
नाशिक :- सामजिक क्षेत्रातील विविध प्रकाचे योगदान देणाऱ्या व समजत मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा पाच व्यक्तीचा मराठा मंच या सामजिक संघटनेच्या वतीने मागील बारा वर्षापासून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सन्मान केला जातो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  शिवगौरव पुरस्कारासाठी राजमाता जिजाऊ चरित्र , शिवचरित्र,सन्माचिन्ह, सन्मापत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असते. खंडू आहेर व यांच्या सोबत च्या टीम ने सकल मराठा परिवार फाउंडेशन च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे केली यात प्रत्येक वर्षी दिवाळीच्या अगोदर किल्यावर दीपोत्सव साजरा करणे. सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून मेळावा घेण्यात येतात.सीमेवरील सैनिकांना राखी पाठवणे.मतदान जनजागृती मोहीम राबवणे.वृक्षारोपण कार्यक्रम घेणे.गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा. १० वी १२ साठी करिअर मार्गदर्शन शिबिरे घेणे.सकल मराठा परीवार मेडिकल टीम च्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेणे .मागील एक वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात ५१८९ रक्त पिशवी संकलन केले तर ३९२ रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले.रायगड ,पन्हाळा,शिवनेरी, सालेर या ठिकाणी...

दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Image
मुंबई ,   दि. २१   :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली आहे. सदरच्या दिवशी सकाळ सत्रात प्रथम भाषेचे पेपर होते, या पेपरच्या वेळी जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर ता. बदनापूर जि. जालना येथील परीक्षा केंद्र कमांक ३०५० या केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याबाबत व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याबाबत, तसेच जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता.मंठा, जि.जालना, केंद्र क्रमांक ३४३६ या परीक्षा केंद्रासंदर्भात काही माध्यमांमधून बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर बातम्यांसंदर्भातील वस्तुस्थिती खालील प्रमाणे १) जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना येथील परीक्षा केंद्र क्रमांक ३०५० या केंद्रावर पेपर फुटीच्या बातमी संदर्भात सदर केंद्रावर भेट दिली असता जी दोन पाने काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल...

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन  स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली दि.२१ : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच...

नाशिक येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

Image
नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज  कार्य करत असते सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला  सकारात्मक प्रतिसाद देत,माणुसकीचा झरा या भावनेतून नाशिक सकल मराठा परिवारा तर्फे  छत्रपति शिवाजी महाराज चौक, श्री साई हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात १३२ रक्तदाते यांनी यावेळी रक्तदान केले. या शिबिरासाठी शिवजन्मोत्सव समिती तसेच डॉ.मिलिंद पवार  यांचे योगदान लाभले. तर मराठा विद्या प्रसारक यांच्या रक्तपेढीचे सहकार्य मिळाले. याशिबिराची सुरवात लग्न मंडपातून येत नवदांम्पत्य प्रविण त्र्यंबक सोनवणे,तृप्ती विठ्ठल सरपत यांनी सोबतच नव जीवनातील पाहिले रक्तदान केले. रवींद्र पदाडे माजी सैनिक यांनी वय (७२) विरेंद्र सिंग ठाकूर , गिरीश पाटील, माजी सैनिक यांनी रक्तदान केले.या शिबिरात अनेक बांधवां सोबत महिला भगिनींनी सहभाग घेतला.अनेक रक्तदात...

मराठा हायस्कूलच्या १६ खेळाडूंना ३ लाख ८ हजार रुपये शिष्यवृत्ती

Image
नाशिक मनपा अर्थसहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे वितरण नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमधील १६ खेळाडूंना नाशिक मनपा अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३ लाख ८ हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मनपा समाजकल्याण उपआयुक्त नितीन नेर, मनपा क्रीडा विभाग प्रमुख आनंद भालेराव, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक राजेंद्र शेळके,शंकर कोतवाल,रामनाथ रायते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे.  यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. उपआयुक्त नितीन नेर यांनी विद्यार्थ्यांना मनपा क्षेत्रातील क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती योजनांविषयी माहिती दिली. तसेच राज्यस्तरावरील क्रीडा शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मराठा हायस्कूल नाशिक हँन्डबॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने राज्यस्तरीय शालेय राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. या सर्व हँन्डबॉलच्या १५ खे...