मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे आलेल्या पाण्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी मांजरपाडा प्रकल्पात वळविणार – मंत्री छगन भुजबळ नाशिक दि.31 :- मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नसून पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ च्यार माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन ते मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची पाण्याची गरज भागून हे पाणी वैजापूर , संभाजीनगरला सुद्धा देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या...