Posts

सर्वर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून IMPDS पोर्टलवरील unautomated सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता

*सर्वर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन पद्धतीने अन्नधान्य वाटपास मान्यता*  मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी कोणत्याही परिस्थितीत राज्यातील नागरिक अन्नधान्य पासून वंचित राहणार नाही - छगन भुजबळ मुंबई,नाशिक,दि.३० जुलै :- सर्वर समस्येमुळे गेल्या आठ दिवसापासून स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनचे वाटप करण्यास अडचण निर्माण होत होती. रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्तभाव दुकानांमधून ऑफलाइन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  IMPDS पोर्टलवरील unautomated सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्याचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्य...