
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख ( प्रतिनिधी पेठ ) दिनांक ३०/०८/२०१९ नायाब तहसिलदार पेठ तहसिल बाळासाहेब भाऊराव नवले याने वडलोपार्जित शेत जमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण निकाली काढण्याकरीता सहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता शेतकरी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक संपर्क साधत सदर घटनेची माहीती दिली असता लाचलुचपत विभाग नाशिक यांच्या पथकाने कारवाई करत लाचखोर नायाब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले पेठ तहसिल कार्यालय नाशिक याला कार्यालयात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले पेठ पोलिस ठाण्यात गुण्हा दाखल करण्यात आला.